रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात पुदीनाचा अशाप्रकारे समावेश करा

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात पुदीनाचा अशाप्रकारे समावेश करा
पुदीना

पुदीनाचे चटणी खायला जवळपास प्रत्येकालाच आवडते. जेवनाची चव वाढवण्यासाठी देखील पुदिन्याचा उपयोग केला जातो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 02, 2021 | 1:22 PM

मुंबई : पुदीनाची चटणी खायला जवळपास प्रत्येकालाच आवडते. जेवनाची चव वाढवण्यासाठी देखील पुदिन्याचा उपयोग केला जातो. पुदीनाच्या पानांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. यात प्रोटीन आणि गूड फॅटही असतात. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि बी या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे पुदीनामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सध्याच्या या कोरोना काळात तर आपण आहारात पुदीनाचा समावेश हा केला पाहिजे. (Peppermint is beneficial for boosting the immune system during corona)

आज आम्ही तुम्हाला पुदीनापासून तयार होणारे एक खाय पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला सात ते आठ पुदीना पाने आणि एक ग्लास पाणी लागणार आहे. सर्वात अगोदर हे पाणी गरम करण्यासाठी मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. त्यानंतर त्या पाण्यात पुदीनाची पाने मिक्स करा आणि साधारण वीस ते तीस मिनिटे उसळूद्या आणि प्या. हे पाणी पिल्याने फक्त आपली रोगप्रतिकारक शक्तीच वाढत नाहीतर यामुळे आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते.

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर पुदिन्याचे सेवन अवश्य करा. कारण वजन नियंत्रित करण्यास पुदीना अत्यंत उपयुक्त असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. पुदीनामुळे जेवलेले चांगल्या पद्धतीने पचते अर्थात पचन व्यवस्था सुस्थितीत राहते. एक चांगला मेटाबॉलिज्म वजन कमी करण्यास मदत करतो. अशा परिस्थितीत पुदिन्याची चटणी आणि हे खास पेय आहारात घेऊ शकतो. पुदीनामुळे तोंडाचे आरोग्य उत्तम राहते. अर्थात पुदीना तोंडाच्या आतील भागात बॅक्टेरियाची वाढ होऊ देत नाही. याशिवाय दातांवरील डाग साफ करण्यास पुदीनाची मदत होते.

सध्याच्या कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी शरीरात स्ट्रॉंग इम्युनिटी पॉवर असण्याची गरज आहे. जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर पुदिन्याची चटणी अवश्य आहारात अंतर्भूत करा. पुदिन्याची चटणी खाऊन तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवाल, त्यामुळे तुमच्या शरीरातील विविध प्रकारच्या व्याधी दूर पळतील. पुदिन्यामुळे नाक, गळा आणि फुफ्फुस स्वच्छ ठेवण्यास मदत होते. पुदिन्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. याच गुणधर्मामुळे पुदीनाचे सेवन केल्यानंतर अगदी खूप वर्षांपासून त्रास देत असलेल्या खोकल्यापासून आराम मिळतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Peppermint is beneficial for boosting the immune system during corona)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें