AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानात पायलट आणि एअर होस्टेस या गोष्टी करू शकत नाहीत, असते सक्त मनाई

विमानाबद्दलच्या अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल जाणून घेण्यास लोकांना फार रस असतो. विमानात अशा अनेक गोष्टी असता ज्या करण्यास पायलट आणि एअर होस्टेस यांनी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली असते. त्या कोणत्या गोष्टी आहेत चला जाणून घेऊयात.

विमानात पायलट आणि एअर होस्टेस या गोष्टी करू शकत नाहीत, असते सक्त मनाई
Pilots and Air Hostesses, Things They Can't Do Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2025 | 2:11 PM
Share

विमान प्रवास करताना आपण फार काही गोष्टी लक्षात घेत नाहीत. पण पायलट आणि एअर होस्टेस यांना अनेक अटी-नियम लागू करण्यात आलेले असतात. तसेच काही गोष्टी पायलट आणि एअर होस्टेसला विमानात काही गोष्टीं करण्यास परवानगी नसते. या गोष्टी पूर्णपणे करण्यास मनाई असते. पण कदाचित त्या गोष्टींकडे आपलेही फार लक्ष जात नाही किंवा त्यावर तेवढा विचार केला जात नाही. सोबतच लोकांना विमानांशी संबंधित माहिती जाणून घेण्यात रसही असतो. चला तर मग जाणून घेऊयात की त्या कोणत्या गोष्टी आहेत.

परफ्यूमचा वास जेव्हा तुम्ही विमानात प्रवास करता तेव्हा तुम्हाला विमानात थोडासा सुगंध जाणवत असेल, पण तुम्ही कधी हे लक्षात घेतलं का? की जेव्हा जेव्हा पायलट किंवा एअर होस्टेस तुमच्या जवळून जातात तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून कोणत्याची परफ्यूमचा सुगंध कधीच येत नाही.कारण त्यामागे अनेक कारणे आहेत.

परफ्यूम का वापरू शकत नाही? पायलट आणि एअर होस्टेस विमान प्रवासादरम्यान परफ्यूम वापरू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे तीव्र वासामुळे पायलटचे लक्ष विचलित होऊ शकते, ज्यामुळे उड्डाण सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो.

दारू परफ्यूममध्ये अनेकदा अल्कोहोल असते. प्रत्येक उड्डाणापूर्वी वैमानिकांची श्वास विश्लेषक चाचणी केली जाते. जर परफ्यूम किंवा इतर अल्कोहोल-आधारित उत्पादने चाचणीवर परिणाम करत असतील तर वैमानिकाला निलंबित केले जाऊ शकते.

तीव्र वासाचा त्रास कधीकधी तीव्र सुगंधामुळे विमानात उपस्थित प्रवाशांना त्रास होऊ शकतो. काही लोकांना परफ्यूमची ऍलर्जी असते, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

केवळ परफ्यूमच नाही तर या गोष्टींवरही बंदी असते उड्डाणादरम्यान, पायलट आणि एअर होस्टेस सॅनिटायझर, माउथवॉश, टूथपेस्ट किंवा अल्कोहोल-आधारित कोणतेही उत्पादन देखील वापरू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारे मद्यपान करू शकत नाही अन्यथा कडक कारवाई करण्यात येते.

औषधांसाठीही नियम कडक आहेत. डीजीसीएच्या नियमांनुसार, जर एखादा पायलट किंवा क्रू मेंबर कोणतेही औषध घेत असेल, तर त्याने उड्डाण करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही प्रकारची औषधे घेऊन फ्लाइट चालवण्यास पायलटला सक्त मनाई असते. त्यामुळे विमान चालवताना अडचणी येऊ शकतात.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.