हिवाळ्यात तुमची बाल्कनी फुलांनी बहरावी असे वाटतंय तर लावा ‘ही’ 5 फुलांची रोपं
हिवाळ्यात तुमची घराची बाल्कनी किंवा गार्डन बहारदार दिसण्यासाठी अनेक फुलांची रोपं आपण लावत असतो. तर आजच्या लेखात आपण अश्या पाच फूलांबद्दल जाणून घेऊयात जे केवळ एक सुंदर दृश्यच तयार करू शकत नाही तर त्यांचा सुगंध आणि रंगाने आपले घराचे वातावरण देखील आनंददायी बनवतील.

हिवाळा ऋतू हा फुलांसाठी एक उत्तम ऋतू मानला जातो. फुलांची झाडं आपल्या बाल्कनीत आणि बागेचे सौंदर्य वाढवातातच पण ते वातावरण छान ताजेतवाने करून टाकतात. तर या ऋतूत दररोज झाडांना पाणी देण्याची गरज लागत नाही. मात्र काही लोकांना असे वाटते की झाडे थंडीत वाढत नाहीत, पण असं नाहीये . तर आजच्या लेखात आपण हिवाळ्यात भरपूर फुलणाऱ्या पाच फुलांच्या रोपांबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांना कसे लावायचे तेही जाणून घेणार आहोत.
झेंडूचे फुलं
हिवाळ्यात झेंडू फुलं चांगले वाढतात आणि भरपूर फुलतात. त्यांची पिवळी आणि नारिंगी फुले तुमच्या टेरेस किंवा बाल्कनीला एक सुंदर बनवतात. या फुलांचा वापर पूजा आणि मंदिर, घर सजावटीसाठी देखील केला जाऊ शकतो. झेंडू लावण्यासाठी रोपवाटिकेतून एक रोप घ्या आणि ते 10 -12 इंचाच्या कुंडीत ठेवा. दर 3-4 दिवसांनी त्याला पाणी द्या आणि 4-5 तास सूर्यप्रकाशात ठेवा.
गुलाबाचं फुलं
गुलाब हे सर्वांच्या आवडीचे फूलं आहे. हिवाळा त्यांच्या वाढीस देखील चालना देतो. मंद सूर्यप्रकाशातही गुलाब फुलतात आणि त्यांचा सुगंध सर्वत्र पसरवतात. हे लाल, पिवळे, पांढरे आणि गुलाबी गुलाब बाल्कनी आणि टेरेसमध्ये सौंदर्य वाढवतात. गुलाबाचं रोप कुंड्या आणि ग्रो बॅगमध्ये दोन्हीमध्ये लावता येतात. कलमी केलेले रोपवाटिका निवडा आणि ते 12-15 इंचांच्या कुंड्यांमध्ये ही रोपं लावा, दर 3-4 दिवसांनी पाणी द्या आणि खराब झालेली किंवा कोमजलेली पाने काढून टाका. यामुळे गुलाबाच्या रोपांची चांगली वाढ होते.
पेटुनिया फुलं
पेटुनिया फुलं हे हिवाळ्यातील सुपरस्टार फूल मानले जाते. हे फुल दक्षिण अमेरिकेत मूळचे आहे, परंतु आता जगभर बागांमध्ये लावले जाते. त्याची फुले जांभळी, गुलाबी, लाल आणि पांढरी अशा विविध रंगांमध्ये येतात. ही एक वेलीसारखी वनस्पती आहे जी रेलिंगवर किंवा लटकणाऱ्या कुंड्यांमध्ये लावता येते. नर्सरीमधून एक रोपं घ्या आणि ती 8-10 इंचांच्या कुंड्यात किंवा लटकणाऱ्या टोपलीत लावा. पेटुनिया फुलाला मोकळी जागा आवडते, म्हणून प्रत्येक कुंडीत फक्त 1-2 रोपं लावा. अधिक नवीन फुले येण्यासाठी कोमेजलेली फुले ताबडतोब काढून टाका.
शेवंतीचे फुलं
शेवंतीचे फुलं नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत सतत फुलतात. ते थंडीतही वाढतात आणि कुंड्यांमध्येही पसरतात. तुम्ही त्यांचा वापर सजावटीसाठी देखील करू शकता. नर्सरीमधून एक रोप घ्या आणि ते कुंडीमध्ये लावा. शेवंतीच्या रोपाला जास्त पाणी देण्याची गरज नसते.
पॅन्सी फुल
हिवाळ्यात बाल्कनीत फुलांचे रोपं लावण्यासाठी पॅन्सी फुल देखील एक उत्तम फूलं आहे. त्याची फुले तुमच्या टेरेसला एक अनोखा लूक देतात. कमी सूर्यप्रकाशात आणि हलक्या सावलीत ते चांगले फुलतात. एक रुंद कुंडी निवडा आणि रोपाला हळूवारपणे मातीत लावा . जर त्याला 2-3तास सूर्यप्रकाश मिळाला तर ते उत्तम आहे. पॅन्सी हिवाळ्यात भरपूर फुलतात म्हणून त्यांना तीव्र सूर्यप्रकाशापासून वाचवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
