दारूपेक्षाही हा पदार्थ लिव्हरचे जास्त नुकसान करतो; अन् हा पदार्थ बहुतेक लोक दररोज खातात
आजकालच्या जीवनशैलीमुळे, आहाराच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात तर फॅटी लिव्हर, लिव्हर इन्फेक्शन आणि लिव्हर सिरोसिस हे आजार विशेषतः सामान्य झाले आहेत. लिव्हरला जास्त अल्कोहोलमुळे किंवा साखरेचे प्रमाण जास्त झाले की त्याचे आजार होतात असे मानले जाते. पण याची अनेकांना कल्पना नसेल की असा एक पदार्थ आहे जो दारूपेक्षाही लिव्हरसाठी खतरनाक असतो.

आजकाल अनेक मधुमेहाप्रमाणेच लिव्हर, किडनीचे आजार होण्याचे प्रमाण देखील तेवढेच वाढले आहे. फॅटी लिव्हर, लिव्हर इन्फेक्शन आणि लिव्हर सिरोसिस हे आजार विशेषतः सामान्य झाले आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे आपली जीवनशैली आणि विशेषतः आपला आहार. लोक सहसा असे गृहीत धरतात की अल्कोहोल, साखर किंवा तेलकट पदार्थ लिव्हरच्या नुकसानासाठी जबाबदार धरले जातात. पण एक पदार्थ असा आहे जो चक्क दारूपेक्षाही जास्त लिव्हरसाठी खतरनाक सिद्ध होतो. आणि मुख्य म्हणजे हा पदार्थ अनेकजण दररोज खातात. नक्की तो कोणता पदार्थ आहे हे जाणून घेऊयात.
हे पदार्थ लिव्हरसाठी सर्वात धोकादायक मानले जातात
डॉक्टरांच्या मते लिव्हरसाठी सर्वात धोकादायक अन्न म्हणजे बियाण्यांचे तेल ज्यालाच आपण Seed oil म्हणतो, जे मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेल्या आणि उच्च उष्णतेच्या उद्योगांमध्ये तयार केले जाते. ते पेट्रोलमध्ये आढळणाऱ्या हेक्सेन नावाच्या द्रावकाच्या संपर्कात येतात. काही सामान्य बियाण्यांच्या तेलांमध्ये सोयाबीन तेल, कॅनोला तेल, कॉर्न ऑइल आणि कापूस बियाण्याचे तेल समाविष्ट आहे. सूर्यफूल तेल आणि द्राक्षाचे तेल देखील या श्रेणीत येतात.
View this post on Instagram
बहुतेक गोष्टींमध्ये बियांचे तेल असते
बहुतेक पदार्थांमध्ये बियांचे तेल असते, त्यामुळे ते टाळणे कठीण होते. म्हणूनच डॉक्टर म्हणतात की ते अल्कोहोलपेक्षाही धोकादायक आहेत. हे तेल चरबीच्या पेशी आणि यकृतात खोलवर जातात आणि वर्षानुवर्षे तिथेच राहतात, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. तळलेले रेस्टॉरंटचे अन्न असो किंवा चिप्स, स्नॅक्स, प्रोटीन बार आणि मेयोनेझ अशा जवळजवळ प्रत्येक पदार्थात हे तेल आढळते.
लिव्हर निरोगी कसे ठेवावे?
तज्ज्ञांच्या मते फॅटी लिव्हरसाठी TUDCA वापरू शकता. जे एक प्रकारचे बॉईल मीठ आहे जे यकृताची जळजळ कमी करण्यास मदत करते, ते घेण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात. तथापि, ते एक पूरक आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते घ्यावे. याव्यतिरिक्त, स्वयंपाकासाठी बियांच्या तेलाऐवजी बटर, ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल वापरणे त्यातल्या त्यात योग्य ठरू शकते. तसेच शेंगदाण्याचे तेल देखील शरीरासाठी तसेच लिव्हरसाठी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
