Health Care | थंड तळवे, पिवळी नखे, पायांमध्ये दिसणारे ‘हे’ बदल असू शकतात आजारांचे लक्षण!

बूट आणि मोजे घालत असल्यामुळे आपले पायांकडे कमीतकमी लक्ष जाते, परंतु आपण त्यांच्या खास गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.

Health Care | थंड तळवे, पिवळी नखे, पायांमध्ये दिसणारे ‘हे’ बदल असू शकतात आजारांचे लक्षण!
आरोग्यविषयक समस्या
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 3:19 PM

मुंबई : पायांची स्थिती आपल्या शरीरातील अनेक रोगांची शक्यता वर्तवू शकते. बूट आणि मोजे घालत असल्यामुळे आपले पायांकडे कमीतकमी लक्ष जाते, परंतु आपण त्यांच्या खास गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. पायात दिसणारे साधे बदल देखील, गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात. चला तर, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया…(Simple changes in feet can be a symptom of dangerous diseases)

भेगाळलेल्या टाचा

सहसा भेगाळलेल्या टाचा मलम किंवा क्रीमने बऱ्या होतात. ऑस्ट्रेलियाच्या फूटकेअर ब्रँड फ्लेक्सिटॉलच्या तज्ज्ञांनी ‘द सन’ वेबसाईटला सांगितले की, लोक सहसा भेगाळलेल्या घोट्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु जर त्यांच्यावर उपचार केले नाहीत, तर वेदना वाढू शकतात. काही प्रकरणांमध्ये, टाचा आतून इतक्या फाटलेल्या असतात की त्यांच्यामधून रक्त येऊ लागते.

तज्ज्ञ म्हणतात की, पायांचा जमिनीशी थेट संपर्क असतो. जमिनीवर अनवाणी चालत असताना किंवा पायांच्या घामामुळे जीवाणू फाटलेल्या पायाच्या आता सहज प्रवेश करतात, ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. कोणत्याही रोगात, विशेषत: मधुमेहामध्ये त्वचेचा रोग किंवा संसर्ग होण्याचा उच्च धोका असतो.

फूट कॉर्न

फूट कॉर्नला गोखरू देखील म्हणतात. हे गाठींसारखे आहे. सहसा खूप घट्ट शूज परिधान केल्यामुळे ही समस्या उद्भवते. पोडियाट्रिस्ट डॉक्टर दीना गोहिलने मेलऑनलाईनला सांगितले की, अनुवांशिकता हे फूट कॉर्नचे सर्वात सामान्य कारण आहे. संधिवात किंवा कोणत्याही दुखापतीमुळेही देखील ही समस्या येऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी, त्यांनी असे बूट घालण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये व्यायामासाठी पायांना पुरेशी जागा मिळेल (Simple changes in feet can be a symptom of dangerous diseases).

कॉलस

गोखरू प्रमाणेच कॉलस देखील खूप घट्ट बूट घालण्यामुळे होतो. याशिवाय ही समस्या हाड घासली जाणे, लठ्ठपणा आणि मधुमेहाशीही संबंधित असू शकते. ती हानिकारक नाहीत, परंतु यामुळे त्वचेला खूप खाज सुटते. डॉ. गोहिल म्हणतात की, शरीरात असंतुलन आणि काही चुकींमुळे देखील कॉलस होतो. यामुळे पाठीच्या खालच्या बाजूला, गुडघे आणि टाचांपर्यंत वेदना देखील होऊ शकते.

थंड तळवे

बर्‍याच लोकांच्या पायाचे तळवे बरेचदा थंड असतात. तथापि, तळवे गरम कपड्याने झाकून किंवा मोजे घालून सामान्य केले जाऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, थंड तळवे असणे हे रायनॉड नावाच्या आजाराचे लक्षण असू शकते. हा एक रोग आहे जो रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम करतो.

पायांची सूज

सहसा पायांची सूज स्वतःच बरी होते, परंतु जर ती स्वतः बरी होत नसेल, तर एडीमा होऊ शकतो. आपण ते डॉक्टरांकडे जाऊन तपासावे. एडीमामध्ये पायांमध्ये जास्त प्रमाणात द्रवपदार्थाच्या वाढीमुळे सूज येते. इजा, किड चावल्यामुळे, मूत्रपिंड, यकृत किंवा हृदय रोग, रक्त गोठणे किंवा इतर संसर्ग यामुळे देखील एडीमा होऊ शकतो.

पिवळी नखे

जर तुमच्या पायांचे नखे पिवळी होत असतील, तर ते बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण असू शकते. काही लोकांमध्ये, हे अधिक नेलपेंट लावण्यामुळे देखील होऊ शकते, परंतु गडद पिवळा रंग फंगल इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. या अवस्थेत, नखे तुटू लागतात, त्यांचा आकार बदलू लागतो आणि त्यात खूप वेदना होते. गंभीर स्थितीत, या नखांच्या संसर्गामुळे त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो. म्हणून याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारित असून, अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(Simple changes in feet can be a symptom of dangerous diseases)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.