AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lemon Facial Pack | लिंबापासून बनवा फेशियल पॅक, त्वचेच्या अनेक समस्या होतील दूर!

लिंबाने आपण आपल्या घरातच सोप्या पद्धतीने फेशियल पॅक बनवू शकता. या प्रक्रियेत केवळ एक लिंबू वापरुन आपण हा फेशियल पॅक बनवू शकता.

Lemon Facial Pack | लिंबापासून बनवा फेशियल पॅक, त्वचेच्या अनेक समस्या होतील दूर!
या सोप्या पद्धतीने बनवा लिंबाचे 7 विविध फेसपॅक
| Updated on: Feb 14, 2021 | 12:22 PM
Share

मुंबई : आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात लिंबू सहज सापडतो. याचा वापर जवळजवळ प्रत्येक घरात केला जातो. लिंबू खूप स्वस्त आणि निरोगी देखील आहे. लिंबामध्ये असे बरेच गुण दडलेले आहेत, जे आपणास माहित देखील नसतात. बहुतेक लोक अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी आणि अपचन टाळण्यासाठी लिंबाचा वापर करतात (Skin Care Lemon Facial Pack).

परंतु, आपण आपले सौंदर्य वाढवण्यासाठी देखील लिंबू वापरू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लिंबू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. अगदी 2 रुपये किंवा 3 रुपयांत सहजपणे बाजारात मिळू शकतात. आपल्या त्वचेचा लिंबाचा वापर केल्याने ती कायमच चमकदार राहील.

लिंबाने आपण आपल्या घरातच सोप्या पद्धतीने फेशियल पॅक बनवू शकता. या प्रक्रियेत केवळ एक लिंबू वापरुन आपण हा फेशियल पॅक बनवू शकता. बऱ्याचदा आपण लिंबू पिळून त्याच्या बिया आणि साली फेकून देतो. परंतु, आपण लिंबाचा रस, बिया आणि साली वापरुन घरच्या घरी फेशियल पॅक बनवू शकता.

त्वचेची टोनिंग

आपल्या त्वचेवर टोनिंग करणे ही फेशियलची पहिली पायरी मानली जाते. बहुतेक स्किन टोनिंगसाठी गुलाबपाणी वापरले जाते, परंतु आपण लिंबू वापरून स्किन टोनर बनवू शकता.

पद्धत :

यासाठी आधी लिंबाचा रस काढा. आता लिंबाची साल पाण्यात उकळा. पाण्यात उकळल्यामुळे ही लिंबाची साले खूप मऊ होतील. पाणी उकळून थंड झाल्यावर चाळणीने गाळून घ्या. आता आपण हे पाणी टोनर म्हणून वापरू शकता (Skin Care Lemon Facial Pack).

फेस स्क्रब

आपली त्वचा नेहमी व्यवस्थित स्क्रब करा. त्वचेला स्क्रब केल्याने पोर्समध्ये जमा झालेली घाण बाहेर येते. या व्यतिरिक्त, मृत त्वचेचा थर देखील काढून टाकला जाऊ शकतो. फेशियलसाठी आपण लिंबाचा वापर करून लिंबू स्क्रब तयार करू शकतो.

पद्धत :

सर्वप्रथम, लिंबाच्या बिया एकाच ठिकाणी साठवून घ्या आणि त्याची बारीक पूड करा. त्याची जाडसर पेस्ट तयार झाल्यावर, आता त्यात थोडा मध घालून मिक्स करा. आता हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि चेहरा चांगला स्क्रब करा.

फेस पॅक

लिंबू फेशियलची तिसरी पायरी म्हणजे फेस पॅक. यासाठी आपण घरी लिंबापासून खूप चांगला फेस पॅक तयार करू शकता.

लेमन पल्प फेस पॅक

साहित्य :

1 टेस्पून लिंबाचा पल्प

1 टेस्पून मध

कृती :

प्रथम लिंबाची साल उकळा आणि त्याचा पल्प एकत्र करा. यानंतर त्यात मध घाला आणि चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा (Skin Care Lemon Facial Pack).

लिंबाचा रस आणि हळद फेस पॅक

साहित्य :

1 चमचा लिंबाचा रस

1 चमचा हळद

मध

कृती :

एका भांड्यात लिंबाचा रस, हळद आणि मध मिसळा. आता हे मिश्रण चेहरा आणि मानेवर वर लावा. 15-20 मिनिटांनंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

चेहऱ्याला मॉइस्चराइझ करा.

फेशियलची शेवटची पायरी म्हणजे चेहरा चांगला मॉइस्चराइझ करणे. यासाठी एका भांड्यात मलई किंवा दही गाळून घ्या आणि नंतर त्यात लिंबाचा रस घाला. या मिश्रणाने सुमारे 5 मिनिटांसाठी आपल्या चेहर्‍यावर पूर्णपणे मसाज करा.

फायदे

यामुळे आपल्या चेहऱ्यावर असलेले काळे डाग दूर होतात. जर आपल्याला दीर्घ काळापासून पिगमेंटेशनची समस्या येत असेल, तर या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लिंबू फेस पॅक किंवा स्क्रब खूप प्रभावी आहे. यामुळे तुमची त्वचा सुधारते. तसेच, आपल्या चेहर्‍याचा रंगही उजळ होतो. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो आपल्या त्वचेच्या पोर्सचा आकार कमी करतो आणि आपली त्वचा घट्ट करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin Care Lemon Facial Pack)

हेही वाचा :

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.