उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घेणार?

उन्हाळ्याच्या ऋतूत चेहऱ्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हे आम्ही तुम्हाला इथे सांगतो.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घेणार?
Skin care routineImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 1:47 PM

उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. या ऋतूत उन्हामुळे आणि मातीमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. त्वचेवर मुरुम, पिंपल्स वगैरे होऊ लागतात. इतकंच नाही तर यामुळे त्वचाही निस्तेज दिसते, उन्हाळ्याच्या ऋतूत चेहऱ्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हे आम्ही तुम्हाला इथे सांगतो.

उन्हाळ्यात त्वचेची घ्या काळजी

त्वचेतील तेल काढून टाका

उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते. अशावेळी त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकावे. यासाठी त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य फेस वॉश ची निवड करा. यामुळे त्वचेचे मुरुमांपासून संरक्षण होते.

त्वचा हायड्रेटेड ठेवा

उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो, ज्यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही हायड्रेटिंग फेस मास्कचा वापर करू शकता. त्याचबरोबर त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

त्वचेच्या डेड सेल्स काढून टाका

त्वचेला एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्वचेला एक्सफोलिएट केल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण, अतिरिक्त तेल दूर होते. यासाठी चांगल्या स्क्रबरचा वापर करावा. यासाठी तुम्ही हवं तर साखर आणि कॉफीचं स्क्रबर तयार करू शकता.

त्वचेचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करा

सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे वय अकाली होऊ शकते. सूर्याची हानिकारक किरणे टाळण्यासाठी उन्हाळ्यात सनस्क्रीन लावायलाच हवी. असे केल्याने त्वचेवर होणारं टॅनिंग टळेल आणि तसेच काळे डाग पडणार नाहीत.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.