स्किन केअर टिप्स: डागरहित आणि चमकदार त्वचेसाठी अशा पद्धतीने वापरा चेहऱयावर दही

दही केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायीही आहे. दही त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. फेसपॅक म्हणूनही तुम्ही दही वापरू शकता. त्वचा सुंदर आणि तजेलदार बनविण्यासाठी तुम्ही दहयापासून बनवलेले फेसपॅक वापरू शकता. जाणून घ्या, दही वापरण्याच्या पद्धती.

स्किन केअर टिप्स: डागरहित आणि चमकदार त्वचेसाठी अशा पद्धतीने वापरा चेहऱयावर दही
Face PackImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 8:52 PM

दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात कॅल्शियम असते, जे वजन नियंत्रणात (In weight control) मदत करते, दात आणि हाडे मजबूत करते, रक्तदाब कमी करते. पण तुम्हाला माहीत आहे का, दही हे आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे. वास्तविक, यामध्ये असलेले पोषक तत्व त्वचेला चमकदार (Brighten the skin) बनवण्यास मदत करतात. तसेच, दहीपासून बनवलेले फेस मास्कच्या वापरामुळे त्वचा दीर्घकाळ हायड्रेट राहते. म्हणूनच तुम्ही तुमच्या त्वचेसाठी दही वापरू शकता. यासाठी तुम्ही घरी काही गोष्टी मिसळून दह्याचा पॅक बनवू शकता. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. हे एक्सफोलिएटर आणि नैसर्गिक ब्लीच म्हणून देखील कार्य करते. दह्यात व्हिटॅमिन बी असते. त्वचेचा रंग उजळण्याचे (Brighten the colors) काम करते. तजेलदार आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही फेसपॅक म्हणूनही दही वापरू शकता. जाणून घ्या, आपण कोणत्या प्रकारे दही वापरू शकता.

साधे दही

एका भांड्यात आंबट दही घ्या. ते चांगले मॅश करा. चेहरा आणि मानेवर लावा. याने त्वचेला काही मिनिटे मसाज करा. 10 ते 12 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा दही वापरू शकता.

दही आणि टोमॅटो

ताजे टोमॅटो घ्या. त्याचे तुकडे करा. ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करा. आता त्यात थोडं दही घाला. ते चांगले मिसळा आणि चेहरा आणि मानेवर लावा. याने चेहऱ्याला काही मिनिटे मसाज करा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

दही आणि चिंचेचा वापर

चिंच पाण्यात उकळून त्याचा गर काढा. चिंचेचा गर एक चमचा घ्या. त्यात एक छोटा चमचा दही घाला. ते चांगले मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

दही आणि पपई

एका भांड्यात २ चमचे ओट्स घ्या. अर्धा कप पपईचे तुकडे ब्लेंडरमध्ये ठेवा. त्यात दही घालून ओट्स घाला. या सर्व गोष्टी मिसळा. मानेवर आणि चेहऱ्यावर लावा. गोलाकार पद्धतीने मसाज करा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.