5

Skin Care | आरोग्यच नव्हे तर, निरोगी-चमकदार त्वचेसाठीही उपयुक्त ‘ड्रायफ्रुट्स’!

सुकामेवा विशेषतः बदाम, अक्रोड आणि मनुका आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.

Skin Care | आरोग्यच नव्हे तर, निरोगी-चमकदार त्वचेसाठीही उपयुक्त ‘ड्रायफ्रुट्स’!
निरोगी-चमकदार त्वचेसाठीही उपयुक्त ‘ड्रायफ्रुट्स’
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 2:30 PM

मुंबई : हिवाळ्यात बहुतेक लोक शरीराला उबदार ठेवण्यासाठी सुकामेवा अर्थात ‘ड्रायफ्रुट्स’चे’ सेवन करतात. हे ड्राय फ्रूट्स तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. यंदा सणांच्या हंगामातही लोकांनी एकमेकांना मिठाईऐवजी ड्राय फ्रूट्सचे बॉक्स दिले आहेत. अशावेळी जर, घरात जास्त ड्रायफ्रुट्स जमा झाले असतील, तर आपण ते आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील वापरू शकता (Skin Care tips Using dry fruits).

सुकामेवा विशेषतः बदाम, अक्रोड आणि मनुका आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. या घरगुती उपायांचा वापर करून आपण त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवू शकता.

बदाम

बरीच माणसं बुद्धी तल्लख करण्यासाठी बदामाचे सेवन करतात. मात्र, हेच बदाम आपल्या त्वचेची काळजी घेण्यास देखील उपयुक्त ठरतात. आपली त्वचा चमकदार आणि निरोगी राहावी यासाठी आपण बदाम वापरू शकता. यासाठी रात्री 4 ते 5 बदाम भिजवावे आणि सकाळी स्क्रबच्या रूपात ते चेहऱ्यावर लावावे. स्क्रब तयार करण्यासाठी बदाम आणि केळी एकत्र करून, त्यांना जाडसर वाटून घ्यावे. हे मिश्रण चेहर्‍यावर सर्क्युलर मोशनमध्ये लावून मसाज करावा. 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा धुवावा (Skin Care tips Using dry fruits).

अक्रोड

अक्रोडमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. त्यात व्हिटामिन बीची सर्वाधिक मात्रा आहे, जी चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि गडद डाग कमी करण्यास मदत करते. अक्रोड हा एक्सफोलीएट एजंट आहे, जो मृत त्वचेचे आवरण काढून टाकण्याचे काम करते. यासाठी 3 ते 4 अक्रोड जाडसर वाटून, त्याची पूड करा आणि त्यात एक चमचा मध मिसळा. आपण हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा. किमान 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा धुवा.

मनुका

मनुक्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. मनुक्याच्या सेवनाने आपली त्वचा हायड्रेट होतेच, परंतु त्यातील ओलावादेखील बराच काळ टिकून राहतो. यासाठी 5 ते 6 मनुका घेऊन त्यात 2 चमचे दूध टाकून जाडसर पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. किमान 15 ते 20 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे आपली त्वचा चमकदार आणि निरोगी दिसेल.

अंजीर

अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकुष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजीराचा नियमितपणाने आहार सेवन केल्यास फायदा होतो. पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin Care tips Using dry fruits)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
शाहांच्या दौऱ्याला अजितदादा का होते गैरहजेर? खडसेंनी सांगितले कारण...
'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
'माझं अर्थखातं टिकेल की नाही माहित नाही', अजित पवार यांचं मोठं वक्तव्य