Perfume: परफ्यूम त्वचेवर लावायचा की कपड्यांवर? 90 टक्के लोकांना माहिती नाही
तुमच्या डोक्यात कधी हा विचार आला आहे का की, परफ्यूम त्वचेवर लावायचा की कपड्यांवर? या प्रश्नाचे उत्तर परफ्यूम वापरणाऱ्या 90 टक्के लोकांना माहिती नाही. आज आपण परफ्यूम लावण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेणार आहोत

तुमच्यापैकी बरेच लोक परफ्यूम वापरत असतील, मात्र परफ्यूम लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे अनेकांना माहिती नाही. तुमच्या डोक्यात कधी हा विचार आला आहे का की, परफ्यूम त्वचेवर लावायचा की कपड्यांवर? या प्रश्नाचे उत्तर परफ्यूम वापरणाऱ्या 90 टक्के लोकांना माहिती नाही. आज आपण परफ्यूम लावण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेणार आहोत, तसेच चुकीच्या पद्धतीने परफ्यूम लावल्यास काय तोटा होतो हेही जाणून घेणार आहोत.
त्वचेवर परफ्यूम लावण्याने काय होते?
तुमच्यापैकी अनेकजण थेट त्वचेवर परफ्यूम लावत असतील. त्वचेवर परफ्यूम लावल्याने त्याचा सुगंध शरीराच्या उष्णतेमुळे सक्रिय होतो, ज्यामुळे तो जास्त काळ टिकतो. त्वचेवर परफ्यूम लावल्याने सुगंधाचे थर हळूहळू बाहेर पडतात, ज्यामुळे ते अधिक नैसर्गिक वाटते. मात्र थेट त्वचेवर परफ्यूम लावल्याने काही तोटेही होतात. जर तुमची त्वचा परफ्यूमला रिअॅक्शन देत असेल तर परफ्यूममधील अल्कोहोल आणि रसायने यामुळे त्वचेला खाज सुटणे किंवा जळजळ होण्याची शक्यता असते. तसेच बऱ्याचदा परफ्यूम लावलेला भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्वचेवर काळे डाग देखील दिसू शकतात.
कपड्यांवर परफ्यूम लावण्यास काय होते?
तुमचे कपडे शोषक असल्यास कपड्यांवर परफ्यूम लावल्याने सुगंध जास्त काळ टिकतो. कपड्यांवर परफ्यूम लावल्याने तो त्वचेच्या संपर्कात येत नाही, त्यामुळे त्वचेला कोणताही धोका निर्माण होत नाही. मात्र काही परफ्यूममुळे विशेषतः गडद रंगाच्या कापडांवर किंवा रेशीमसारख्या नाजूक कापडांवर डाग उमटतात. त्यामुळे अशा कपड्यांवर थेट परफ्यूम लावणे टाळावे.
परफ्यूम लावण्याची योग्य पद्धत
- तुमची त्वचा परफ्यूमला रिअॅक्शन देत नसेल तर तुम्ही मनगट, मान, कानांच्या मागे परफ्यूम लावू शकता.
- याशिवाय तुम्ही कपड्यांवर हलका स्प्रे करू शकता, मात्र कपड्यांवर डाग पडणार नाहीत याची काळची घ्या.
- परफ्यूम लावताना लेयरिंग करा, प्रथम बॉडी परफ्यूम किंवा डिओडोरंट लावा आणि नंतर कपड्यांवर हलका स्प्रे करा.
तुम्ही योग्य पद्धतीने परफ्यूम लावल्यास त्वचेची व कपड्यांची हाणी टळते. तसेच सुगंधही बराच काळ राहतो. त्यामुळे यापुढे तुमची त्वचा आणि कपडे यासाठी काय करजेचे आहे हे लक्षात घेऊन परफ्यूम लावा.
