शांत झोप हवीये? रात्री झोपण्यापूर्वी या 5 गोष्टी करा
आरोग्य तज्ञांनुसार, प्रत्येकाने दररोज किमान 7 - 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. पण अनेकांना रात्री नीट झोप येत नाही आणि ते उशिरापर्यंत जागे राहतात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. जर तुम्हीही निद्रानाश किंवा अपुऱ्या झोपेच्या समस्येने त्रस्त असाल, तर झोपण्यापूर्वी 'या' सोप्या टिप्स वापरून पहा.

आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. झोपेची कमतरता आरोग्यासाठी खूप हानिकारक असते आणि यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान 7 ते 8 तास गाढ झोप घेणे गरजेचे आहे. पण अनेक लोकांना रात्री लवकर झोप येत नाही किंवा त्यांची झोप वारंवार मोडते. यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते. जर तुम्हीही अशा प्रकारच्या झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ 5 सोप्या टिप्स नक्की फॉलो करा. या उपायांमुळे तुम्ही रात्रभर शांत झोपू शकाल आणि सकाळी पूर्णपणे ताजेतवाने व ऊर्जावान (Energetic) होऊन उठाल.
1. ‘स्क्रीन टाइम’ कमी करा
आजकाल लोक झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, जे आपल्या झोपेचे सर्वात मोठे शत्रू बनले आहेत. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणारा ‘ब्लू लाईट’ शरीरातील ‘मेलाटोनिन’ या झोप आणणाऱ्या हार्मोनची पातळी कमी करतो. यामुळे झोप लागण्यास अडचण येते. म्हणून, झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा आणि एक शांत व आरामदायी वातावरण तयार करा.
2. कोमट पाणी किंवा हर्बल चहा प्या
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी किंवा कॅमोमाइल, लॅव्हेंडर यांसारख्या हर्बल चहाचे सेवन केल्याने शरीर आणि मन दोन्ही शांत होतात. ही पेये ताण कमी करतात आणि ‘मेलाटोनिन’ हार्मोनच्या निर्मितीला चालना देतात, ज्यामुळे लवकर झोप येते. या पेयांचे सेवन केल्यास तुमची झोप अनेक तासांपर्यंत मोडत नाही, ज्यामुळे आरोग्याला जबरदस्त फायदा होतो.
3. हलके ‘स्ट्रेचिंग’ किंवा मेडिटेशन करा
रात्री झोपण्यापूर्वी 5 – 10 मिनिटांसाठी हलका योगा किंवा ‘स्ट्रेचिंग’ केल्याने शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. तसेच, ‘मेडिटेशन’ केल्याने मन शांत होते आणि डोक्यात सुरू असलेल्या विचारांच्या गुंतागुंतीतून आराम मिळतो. यामुळे लवकर झोप लागते आणि झोपेची खोली वाढते. जर तुमच्याकडे वेळ असेल, तर रात्रीच्या वेळी हलका ‘वर्कआउट’ देखील करू शकता, ज्यामुळे शरीर रिलॅक्स होते.
4. जड अन्न आणि कॅफीन टाळा
रात्रीच्या वेळी जड जेवण किंवा कॅफीनयुक्त पेये, जसे की कॉफी, चहा, चॉकलेट, यांचे सेवन झोपेमध्ये अडथळा निर्माण करू शकते. रात्रीचे जेवण हलके असावे आणि झोपण्याच्या किमान 2 तास आधी ते पूर्ण करावे, असा प्रयत्न करा. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि झोपेत कोणताही व्यत्यय येत नाही. याव्यतिरिक्त, दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा, ज्यामुळे शरीराची ‘झोपण्याची सायकल’ व्यवस्थित राहते.
5. झोपण्यासाठी योग्य वातावरण तयार करा
चांगल्या झोपेसाठी तुमच्या खोलीचे तापमान न खूप गरम आणि न खूप थंड असावे, ते आरामदायक असावे. खोलीत पूर्ण अंधार असावा आणि बाहेरचा कोणताही आवाज नसावा. तुम्हाला हवे असल्यास, हलके ‘सॉफ्ट म्युझिक’ देखील लावू शकता, जे झोप अधिक गाढ करण्यास मदत करते. तुमचे उशी आणि गादी देखील आरामदायक असावे, कारण ते झोपेच्या गुणवत्तेवर थेट परिणाम करतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
