झोपेशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? शरीरात काय होतात बदल
झोपेशिवाय माणसाला किती थकवा येतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. चिडचिड, एकाग्रता कमी होते. पण झोपेशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो तसेच त्याचे शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊयात.

झोप ही माणसाच्या शरीराच्या प्राथमिक गरजांपैकी एक आहे. एक दिवस जरी झोप पूर्ण मिळाली नाही तरी आजारी पडल्यासारखं वाटत. तसेच तणाव येतो तो वेगळा. त्यामुळे शरीराला झोप ही आवश्यक असतेच असते. त्याशिवाय माणूस त्याचे मानसिक संतूलन नीट ठेऊ शकत नाही. आपल्या शरीराला आणि मनाला विश्रांती फार आवश्यक असते जी, पुरेशी झोप घेतल्याने मिळते. पुरेशी झोप नाही मिळाली तर चिड चिड, राग सगळंच वाढतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादी व्यक्ती झोपेशिवाय किती दिवस जगू शकते? याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक अभ्यास केले गेले आहेत आणि अनेक लोकांनी त्यासंबंधीचे रेकॉर्डही प्रस्थापित केले आहेत. चला जाणून घेऊया की एखादी व्यक्ती सतत किती दिवस जागे राहू शकते.
झोपेशिवाय किती दिवस जगू शकतो?
झोपेशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो हे कोणत्याही संशोधनात निश्चित करता आलेले नाही. तथापि, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (संदर्भ) नुसार , 1997 पर्यंत, सर्वात जास्त वेळ जागे राहण्याचा विक्रम रॉबर्ट मॅकडोनाल्ड यांच्याकडे होता, ज्यांनी 18 दिवस, 21 तास आणि 40 मिनिटे अजिबात झोप घेतली नाही. तथापि त्या अनेक दुष्परिणामही त्यांच्या शरीरावर झाले . मात्र या विक्रमाच्या दुष्परिणामांमुळे, 1997 मध्ये ही कॅटेगिरीच बंद करण्यात आली.
झोपेच्या कमतरतेचे दुष्परिणाम
ऑस्ट्रेलियन सरकारच्या आरोग्य वेबसाइट (संदर्भ) नुसार , झोपेचा अभाव ही झोपेच्या कमतरतेमुळे होणारी एक स्थिती आहे . ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकते आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
झोपेच्या कमतरतेचे दुष्परिणाम
विचार करण्याची क्षमता कमी होणे,तीव्र मूड बदल, कमी ऊर्जा, कमकुवत प्रतिकारशक्ती, उच्च रक्तदाब, मधुमेहाचा धोका, वजन वाढणे किंवा लठ्ठपणा, हृदयरोगाचा धोका, शारीरिक असंतुलन बिघडणे, कामवासना कमी होणे अशा बरेच गंभीर परिणाम होतात.
सतत 24 तासांपेक्षा जास्त वेळ जागे राहण्याचे परिणाम
24 तास झोप न लागणे ही एक सामान्य स्थिती आहे जी अनेकांना अनुभवायला मिळते. या काळात झोपेच्या कमतरतेची लक्षणे, जसे की जांभई येणे आणि उर्जेचा अभाव, दिसू शकतात, परंतु जेव्हा तुम्ही २४ तासांपेक्षा जास्त वेळ जागे राहता तेव्हा झोपेच्या कमतरतेची लक्षणे अधिक तीव्र होतात.
पुरेशी झोप घेण्यासाठी टिप्स
दररोज त्याच वेळी झोपायला जा. खोली शांत, आरामदायी, अंधारी आणि योग्य तापमानात ठेवा. टीव्ही, संगणक आणि फोन इत्यादी खोलीपासून दूर ठेवा. झोपण्यापूर्वी जड जेवण, कॅफिन आणि अल्कोहोल टाळा . तंबाखू खाऊ नका किंवा झोपण्याआधी सिगारेट ओढू नका दररोज व्यायम करा
