या देशात येताच करोडपती होतात भारतीय; सुंदरच नाही तर स्वस्त आहे हा देश
Budget Trip : या देशात येताच भारतीय नागरिक करोडपती होतात, हे वाचून तुम्हाला धक्का बसेल. पण हे सत्य आहेत. या देशात अनेक भारतीय फिरायला येतात. येथील निसर्ग तुम्हाला प्रेमात पाडतो. कोणता आहे हा देश, जाणून घ्या...

Indian Rupee to Lao Kip: लाओस या देशाचं अधिकृत नाव लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक असं आहे. दक्षिण-पूर्व आशियातील हा एक छोटा परंतु ऐतिहासिक देश आहे. वियनतियाने ही या देशाची राजधानी आहे. भारत आणि लाओसचे संबंध अति प्राचीन आहेत. सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धानंतर अनेक भारतीयांनी आसाम आणि मणिपूरच्या मार्गाने इंडोचायना क्षेत्रात आश्रय घेतला. ते तिथेच स्थायिक झालेत. कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनामपर्यंत भारतीय पोहचले.
भारतीय कसे होतात येथे करोडपती?
लाओसमध्ये 1 भारतीय रुपयाची किंमत जवळपास 251.91 लाओ किप इतकी आहे. म्हणजे या देशात जर तुम्ही 50,000 रुपये घेऊन गेलात तर या देशात तुमची रक्कम 1.26 कोटी लाओ किप इतकी होते. वाचताना ही रक्कम मोठी वाटते. पण येथे फिरण्यासाठी मोठा खर्च लागत नाही. हा देश तसा स्वस्त मानण्यात येतो.
भारतीयांसाठी लाओसवासियांचा हळवा कोपरा
लाओसमधील अनेक स्थानिक स्वतःची ओळख भारतीयांचे वंशज अशीच करून देतात. या दक्षिण-पूर्वमधील एकमेव देशाला स्वतःचा समुद्र किनारा नाही. या देशाला सर्व बाजूंनी जमीन आहे. पण या देशावर निसर्ग मेहरबान झाला आहे. त्याने या देशावर मुक्त हस्ते उधळण केली आहे. येथे शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात आल्यावर मन प्रसन्न होते. पर्यटक त्यांचा थकवा विसरून जातात. येथील स्ट्रीट फूड अत्यंत रुचकर आणि तितकेच स्वस्त आहे. रूचकर स्टिकी राईस, लार्ब आणि नूडल सूप सारख्या डिशेज केवळ 20 ते 40 रुपयात मिळतात. तर स्थानिक प्रवासासाठीची ऑटो 12 ते 40 प्रति प्रवाशी या दराने मिळते.
एका दिवसाचा खर्च किती?
या देशातील राहणे, जेवण, पर्यटन आणि मुक्कामाचा सरासरी खर्च साधारणतः 1,500 ते 3,000 रुपये प्रति दिवस इतका आहे. म्हणजे भारतातील कोणत्याही शहरातील खर्चा इतका आहे. 7 दिवसांची येथील ट्रिप ही साधारपणे 40,000 ते 70,000 रुपयांमध्ये पूर्ण होते. यात हॉटेलिंग, पर्यटन स्थळं पाहणे, जेवण्याच्या खर्चाचा समावेश आहे.
या देशात जाणे सोपे आहे का?
भारतीय प्रवाशांसाठी लाओस या देशात जाणे सोपे आहे. येथे Visa on Arrival ची सुविधा मिळते. म्हणजे या देशात अगोदर व्हिसा घेण्याची गरज नाही. मुद्रा विनिमय पण सोपं आहे. येथील लोक आदरतिथ्य करण्यात पुढे आहेत. कमी बजेटमध्ये परदेशात जायचे असेल तर हा देश चांगला पर्याय आहे. येथे जाण्यासाठी मोठ्या शहरातून विमान सेवा आहे.
