चेहऱ्यावरील टॅनिंगमुळे त्रस्त आहात? मग, ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा !

उन्हाळ्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर टॅनिंगची जास्त समस्या निर्माण होते.

चेहऱ्यावरील टॅनिंगमुळे त्रस्त आहात? मग, 'हे' फेसपॅक नक्की ट्राय करा !
सुंदर त्वचा

मुंबई : उन्हाळ्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर टॅनिंगची जास्त समस्या निर्माण होते. टोमॅटोचा रस देखील त्वचेवरील टॅनिंग काढून टाकतो. यासाठी दोन चमचे टोमॅटोचा रस, तांदळाचे पीठ एक चमचा घ्या आणि पेस्ट बनवा. यानंतर, जर आपल्याकडे मध असेल तर आपण या फेस मास्कमध्ये अर्धा चमचे मध देखील वापरू शकता. याने चेहरा चमकू लागेल. (Special tips for removing facial tanning)

चंदन आणि गुलाब पाणी फेसपॅक – 2 चमचे चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. यानंतर ते त्वचेवर 2 तासांसाठी लावा. थंड पाण्याने धुवावे. हे आपली त्वचा थंड करते. दूध आणि तांदळाचा पीठाचा फेसपॅक – तांदळाच्या पिठात 2 चमचे दूध मिसळून जाड पेस्ट बनवा. 1 किंवा 2 तासांसाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हे त्वचा चमकदार करते. एका भांड्यात एक चमचा कॉफी, दही आणि एक चिमूटभर हळद घालून पेस्ट तयार करावी लागेल. नंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा.

लिंबूमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे त्वचा चमकदार बनविण्यासाठी कार्य करते. हे फेसपॅक बनविण्यासाठी तुम्हाला एका भांड्यात एक चमचा कॉफी आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळावा लागेल. ते चांगले मिसळावे जेणेकरुन ते एकसारखे मिक्स व्हायला पाहिजे. ही पेस्ट सुमारे 15 मिनिटे चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा.

कॉफी त्वचेमध्ये एक्फोलीएटर म्हणून कार्य करते जे टॅन काढून टाकण्यास मदत करते. तसेच चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला एका भांड्यात एक चमचा कॉफी, दही आणि एक चिमूटभर हळद घालून पेस्ट तयार करावी लागेल. नंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

लिंबाचा रस आणि मध फेसपॅक – 1 चमचे मध आणि 1 चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि 1 तास ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हा लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचप्रमाणे कार्य करतो आणि मध त्वचेमध्ये ओलावा राखतो. केशर आणि दुधाचा फेसपॅक- 5 चमचे दुधात 3 ते 4 केशर पाने घाला. 30 मिनिटांसाठी तसेच ठेवा. यानंतर, आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर 2-3 तास ही पेस्ट तशीच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा चमकदार होते.

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

(Special tips for removing facial tanning)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI