AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर लावा ‘या’ 4 गोष्टी, त्वचा होईल चमकदार

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे खूप महत्वाचे बनते. तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि घामामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी त्वचेच्या काळजीसाठी या उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर काही नैसर्गिक गोष्टी लावू शकता. ज्यामुळे त्वचा चमकदार होईल. तसेच त्वचेला योग्य पोषण मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर लावा 'या' 4 गोष्टी, त्वचा होईल चमकदार
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Apr 14, 2025 | 1:52 PM
Share

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या ऋतूत, तीव्र सूर्यकिरणे, घाम आणि प्रदूषण यामुळे त्वचा निर्जीव दिसते. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. पुरळ येणे, मुरूम यासारख्या समस्येमुळे चेहऱ्याची चमक कमी होते. अशातच तुम्हाला यापासून सुटका मिळवण्यासाठी व उन्हाळ्यात त्वचेला ताजेपणा आणि चमक द्यायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही घरगुती उपाय करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी, बहुतेक लोकं ब्युटी ट्रिटमेंट त्वचेवर करतात. पण उन्हाळ्यात त्वचेला जास्त हायड्रेशनची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत तुम्ही ऑर्गेनिक गोष्टींच्या मदतीने चेहरा चमकदार करू शकता. तसेच या ऑर्गेनिक उपायांमुळे त्वचेचे कोणते नुकसान होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात…

कोरफड

कोरफड त्वचेला थंडावा आणि ओलावा प्रदान करते. कोरफड त्वचेची जळजळ, सूज आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते. याकरिता उन्हाळ्यात कोरफड जेल वापरणे खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्याआधी तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर हलक्या हातांनी तुमच्या चेहऱ्यावर ताजे कोरफड जेल लावा.

नारळाचे तेल

नारळाचे तेल त्वचेसाठी एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. हे त्वचेला खोलवर पोषण देते आणि रात्रभर त्वचेला ओलावा देते. उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि डिहायड्रेटेड होऊ शकते, म्हणून चेहऱ्यावर नारळाचे तेल लावल्याने त्वचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते. तथापि, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर नारळाचे तेल कमी प्रमाणात लावा.

गुलाब पाणी

गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने करते. हे एक नैसर्गिक टोनर आहे जे त्वचेचे छिद्र मोकळे करण्यास मदत करते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने त्वचा थंड होते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावर गुलाबपाणी स्प्रे करू शकता किंवा कापसाच्या साहाय्याने लावू शकता. यामुळे त्वचा ताजी आणि घट्ट होते.

कच्चे दूध

तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कच्चे दूध देखील लावू शकता. यामुळे चेहरा हायड्रेट राहील आणि पोषणही मिळेल. चेहऱ्यावर नियमितपणे कच्चे दूध लावल्याने त्वचेचा रंगही सुधारू शकतो. रात्री कापसाच्या मदतीने कच्चे दूध चेहऱ्यावर लावा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसातच तुम्हाला याचा फरक दिसेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा