AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टॅमिना वाढवण्यासाठी दररोज ‘या’ सुपरफूड्सचे करा सेवन

तुम्हाला दिवसभर सक्रिय आणि उत्साही राहायचे असेल, तर योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, स्टॅमिना वाढवण्यासाठी, तुमच्या दैनंदिन आहारात काही खास सुपरफूड्सचा समावेश करा. चला या पदार्थांबद्दल जाणून घेऊया. -

स्टॅमिना वाढवण्यासाठी दररोज 'या' सुपरफूड्सचे करा सेवन
| Edited By: | Updated on: Jul 14, 2025 | 4:40 PM
Share

तुम्हाला जर दिवसभर उत्साही आणि सक्रिय राहायचे असेल, तर फक्त व्यायाम करणे पुरेसे नाही तर योग्य आहार घेणे देखील खूप महत्वाचे आहे. यासाठी शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि थकवा टाळण्यासाठी, काही खास सुपरफूड्सचे सेवन करणे फायदेशीर आहे.

सुपरफूड्सचे सेवन केवळ शारीरिक ताकद वाढवत नाहीत तर मानसिक सतर्कता देखील राखतात. तर आजच्या या लेखात आपण अशा काही सुपरफूड्सबद्दल जाणून घेणार आहोत जे शरीरात स्टॅमिना वाढवण्यास उपयुक्त ठरतील. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

केळी

केळी हे एक उत्तम नैसर्गिक ऊर्जा वाढवणारे पदार्थ आहे. त्यात कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी6 सारखे भरपूर पोषक घटक असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि स्नायूंना मजबूत बनवतात. व्यायामापूर्वी किंवा सकाळच्या नाश्त्यात केळं खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

ओट्स

ओट्स सेवन देखील खूप उपयुक्त ठरते. कारण ओट्स हे हळूहळू पचतात, ज्यामुळे ते शरीराला बराच काळ ऊर्जावान ठेवतात. तर या ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिने देखील असतात, जे स्टॅमिना वाढवण्यास आणि साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करतात.

अंडी

अंड्यामध्ये उच्च प्रथिने आणि अमीनो आम्ल भरपूर प्रमाणात असतात, जे स्नायू पुनर्प्राप्ती आणि ऊर्जा वाढविण्यास मदत करतात. त्यात असलेले व्हिटॅमिन बी 12 आणि लोह शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतात, ज्यामुळे थकवा कमी होतो.

नट्स आणि बिया

बदाम, अक्रोड, चिया बियाणे आणि अळशीच्या बिया यांमध्ये हेल्दी फॅट ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात, जे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा प्रदान करतात आणि सहनशक्ती वाढवतात.

पालक

पालक हे लोह आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे, जे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवून थकवा दूर करते. स्नायूंची क्षमता वाढवण्यास देखील ते उपयुक्त आहे.

रताळे

रताळ हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबरने समृद्ध असतात, ज्यांच्या सेवनाने हळूहळू ऊर्जा देतात आणि शरीराला जास्त काळ सक्रिय ठेवतात.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स चयापचय वाढवतात आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. मानसिक सतर्कता आणि शारीरिक सहनशक्ती वाढवण्यासाठी ते फायदेशीर आहे.

दही

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स, प्रथिने आणि कॅल्शियम असतात, जे पचन सुधारतात आणि शरीर हलके आणि ऊर्जावान ठेवतात. ते खाल्ल्याने थकवा आणि आळस दूर राहतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.