वर्षातून फक्त एका दिवसासाठी उघडणारे मंदिर… शिवलिंगाऐवजी होते वडाच्या झाडाची पूजा
तामिळनाडूतील बोडू अवुदैयार हे मंदिर वर्षातून फक्त एकच दिवस उघडते, जिथे भगवान शिवाची पूजा शिवलिंगाऐवजी वडाच्या झाडाच्या रूपात केली जाते. भाविक येथे विशेष नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा करतात.

तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील एक असे मंदिर आहे, जे वर्षभर बंद राहते आणि फक्त कार्तिक महिन्याच्या सोमवारी उघडले जाते. हे मंदिर म्हणजे बोडू अवुदैयार मंदिर आहे जे त्यांच्या अनोख्या परंपरा आणि रहस्यमय श्रद्धांसाठी प्रसिद्ध आहे. मंदिरात प्रकट झाले होते आणि तेव्हापासून हे ठिकाण श्रद्धेचे एक प्रमुख केंद्र बनलेले आहे.
वडाच्या झाडाची करतात पुजा
अनेकदा आपण शिवकालीन किंवा शिवमंदिरात शिवलिंगाची पुजा करतो. परंतु तामिळनाडू येथील तंजावर जिल्ह्यातील बोडू अवुदैयार मंदिरात भगवान शिव यांची पूजा मुर्ती किंवा शिवलिंगाच्या स्वरूपात न करता तेथे असलेल्या एका मोठ्या वडाच्या झाडाची पुजा भगवान शंकर मानुन करतात. तेथील लोकं ही या वडाच्या झाडाला शिवशंकराचा अवतार मानून मनोभावे पूजा करतात. त्याचबरोबर पुजा करताना प्रसाद म्हणून वडाची पाने आणि पवित्र पाणी अर्पण केले जाते.
मंदिराच्या नावामागील मनोरंजक कथा
तामिळनाडूच्या तंजावूर येथील या मंदिराला बोडू अवुदैयार मंदिर हे नाव कसे काय पडले यामागे एक मनोरंजक कथा आहे. आख्यायिकेनूसार, दोन महान ऋषी- वनगोबर आणि महागोबर-खोल ध्यानात होते आणि देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे यावर चर्चा करत होते गृहस्थ जीवन की त्याग? मग भगवान शिवशंकर हे स्वत: पांढऱ्या रूईच्या झाडाखाली प्रकट झाले आणि त्यांनी ऋषीमुनींना संदेश दिला की खऱ्या तत्वांचे पालन करणारा व्यक्ती कोणापेक्षाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. या कारणास्तव या मंदिराच्या देवतेला ‘पोट्टू अवुदैयार’ आणि ‘मथ्यपुरीश्वर’ असेही म्हणतात.




या मंदिराचे दरवाजे फक्त यादिवशीच उघडतात
हे मदिंर वर्षभर बंद असते आणि कार्तिक महिन्याच्या सोमवारीच या मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी उघडले जातात. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव त्यांच्या अनुयायांसह या मंदिरातील वेल्लालाल झाडाखाली म्हणजे वडाचे झाड येथे आले आणि नंतर त्या झाडाशी एकरूप झाले. या कारणास्तव दरवर्षी मध्यरात्री मंदिराचे दरवाजे उघडतात आणि विशेष पूजा केली जाते. इतर दिवशी हे मंदिर पूर्णपणे बंद असते.
मंदिराचे दरवाजे उघडताच भक्तांकडून केले जाते अनोखे दान
दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हजारो भक्त येथे शिवशंकाराच्या दर्शनासाठी येतात आणि भगवान शिवाला विविध वस्तू अर्पण करतात. भाविक सोने, चांदी, पितळ, पैसे तसेच तांदूळ, डाळ, उडीद, मसुर, तीळ, नारळ, आंबा, चिंच, मिरच्या, भाज्या असे प्रसाद म्हणून अर्पण करतात.त्याचबरोबर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी येथील काही लोकं अगदी बकरी, कोंबडी हे देखील प्रसाद म्हणून अर्पण करतात. त्यांचा असा विश्वास आहे की अशा प्रकारे भगवान शिवाचे आशीर्वाद त्यांच्या सर्व भक्तांवर राहतो आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)