AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 3 घरगुती उपायांमुळे कोरड्या स्कॅल्पपासून मिळेल मुक्ती, काही दिवसांतच दिसेल फरक

स्कॅल्प कोरडी पडल्याने खाज सुटणे आणि कोंड्याची समस्या अनेक लोकांना त्रास देते. अशावेळेस 3 सोपे घरगुती उपाय अवलंबून तुम्ही या समस्येपासून बऱ्याच प्रमाणात मुक्त होऊ शकता. चला जाणून घेऊयात...

'या' 3 घरगुती उपायांमुळे कोरड्या स्कॅल्पपासून मिळेल मुक्ती, काही दिवसांतच दिसेल फरक
dry scalp
| Edited By: | Updated on: Sep 13, 2025 | 9:52 PM
Share

बदलत्या वातावरणाचा प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्याचबरोबर त्यांचा परिणाम केसांवर देखील होतो. कारण दमट वातावरणामुळे अनेकांना केस गळण्याच्या व डोक्यात कोंडा होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशातच तुम्हाला कोंड्यामुळे डोक्यात खूप खाज येते आणि केसंही पांढरे झाले आहेत तर ते कोरड्या स्कॅल्पचे लक्षण आहे. कोरड्या स्कॅल्पमुळे केवळ खाज सुटत नाही तर केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. जर तुम्हाला या समस्येने त्रास होत असेल, तर आजच्या लेखात ३ घरगुती उपाय सांगितलेले आहे जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला जाणून घेऊयात.

नारळाचे तेल

केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी नारळाचे तेल प्रत्येक घरामध्ये वापरले जाते. तर नारळाचे तेल केवळ केसांना पोषण देत नाही तर कोरड्या स्कॅल्पसाठी एक रामबाण उपाय देखील आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डोक्याला थोडे कोमट नारळाच्या तेलाने मालिश करू शकता आणि सकाळी तुमचे केस धुवू शकता. काही दिवसांत तुम्हाला फरक दिसू लागेल.

कोरफड जेल

कोरफडीमध्ये मॉइश्चरायझिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे कोरड्या आणि खाज येणाऱ्या स्कॅल्पला आराम देतात. यासाठी ताजे कोरफडीचे जेल थेट स्कॅल्पवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने तुमची स्कॅल्प लवकरच निरोगी होईल.

दह्याचा हेअर मास्क

दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे स्कॅल्प स्वच्छ करण्यास आणि स्कॅल्पमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीमध्ये दही घेऊन त्यात थोडे मध मिक्स करून पेस्ट बनवा. ते तुमच्या स्कॅल्पवर चांगले लावा आणि 30 मिनिटांनी केस धुवा. हा मास्क तुमच्या स्कॅल्पला हायड्रेट करेल आणि तुमचे केस मऊ करेल.

या सोप्या उपायांचा अवलंब करून, तुम्ही कोणत्याही केमिकलशिवाय तुमच्या कोरड्या टाळूच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता आणि तुमचे केस निरोगी बनवू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक