Vegetarian protein sources : शाकाहारींनो… आता ‘या’ पदार्थांतून Chicken leg piecesपेक्षा जास्त प्रोटीन मिळवा

Vegetarian protein sources : शाकाहार घेत असलेल्यांना प्रोटीन कसे व कोणत्या पदार्थांतून घ्यावे, असा प्रश्‍न पडत असतो. आम्ही अशा पाच शाकाहारी पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यातून मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळेल.

Vegetarian protein sources : शाकाहारींनो... आता ‘या’ पदार्थांतून Chicken leg piecesपेक्षा जास्त प्रोटीन मिळवा
प्रोटीनची गरज पूर्ण करणाऱ्या डाळी/प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 2:49 PM

Vegetarian protein sources : शरीराची झीज भरून काढण्यासाठी शरीरात प्रोटीन (Protein) अत्यंत आवश्‍यक असते. या माध्यमातून शरीराची रोग प्रतिकारशक्तीदेखील वाढत असते. प्रोटीनमुळे केवळ स्नायू मजबूत होत नाहीत तर आपल्याला दिवसभर उर्जावान ठेवण्यासाठी, उत्साही बनवण्यासाठी प्रोटीन अत्यंत आवश्‍यक असतात. अंडी, मांस, मासे यासारख्या मांसाहारी गोष्टी प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत. अनेकदा शाकाहार घेणारी मंडळींमध्ये प्रोटीनची कमतरता जाणवत असते. शरीरातील प्रोटीनच्या गरजेबद्दल लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी ‘प्रोटीन डे’देखील साजरा केला जातो. विशेषत: शाकाहारी (Vegetarian) लोकांसाठी अशा 5 पदार्थांबद्दल सांगत आहोत ज्यातून चिकन लेग पीसपेक्षा जास्त प्रोटीन मिळते. ‘हेल्थलाइन’च्या अहवालानुसार, त्वचा आणि हाडे नसलेल्या चिकन लेग पीसमध्ये (Chicken leg pieces) सुमारे 12.4 ग्रॅम प्रोटीन आढळते. तर काही शाकाहारी पदार्थांमध्ये यापेक्षा जास्त प्रोटीन असल्याचा दावा करण्यात आला आहे.

1) मसूर

मसूरची डाळ ही प्रोटीनचा उत्तम स्रोत मानली जाते. एक कप उकडलेल्या मसूरमध्ये सुमारे 17.86 ग्रॅम प्रोटीन आढळतात. यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि फोलेटचे प्रमाणही जास्त असते. मसूर सहज व मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांचा जरूर आहारात समावेश करावा.

2) हरभरे

शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी हरभऱ्याचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो. एक कप उकडलेल्या हरभऱ्यांमध्ये सुमारे 14.53 ग्रॅम प्रोटीन्स आढळतात. साधारणत आपल्या आहारात सकाळी नाश्‍त्याला मोड आलेल्या हरभऱ्यांची उसळ खावी, तर कार्बोहायड्रेट्स, असंतृप्त फॅटी अॅसिड्स यांसारखे पोषक घटकही त्यात आढळतात.

3) शेंगदाणे किंवा बदाम

प्रोटीनसाठी शेंगदाणे व बदाम हे उत्तम मानले जातात. शाकाहारी लोक शेंगदाणे किंवा बदाम यांचा आपल्या आहारात चांगला समावेश करू शकतात. अर्धा कप शेंगदाण्यांमध्ये सुमारे 20.5 ग्रॅम प्रोटीन्स्‌ असतात. तर अर्धा कप बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला सुमारे 16.5 ग्रॅम प्रोटीन मिळत असते.

4) मूग

मूग हे शेंगावर्गीय पदार्थांमध्ये मोडले जात असतात. यामध्ये लोह आणि फायबरसह प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात असतात. एक कप उकडलेल्या मूगमध्ये सुमारे 14.18 ग्रॅम प्रोटीन आढळतात. नाश्त्यामध्ये याचा समावेश केल्यास शरीराला अनेक मोठे फायदे मिळू शकतात.

5) शेंगा

राजमा, शेवगा अशा अनेक शेगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आढळतात. एक कप शेंगांमध्ये 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन्स असतात. याव्यतिरिक्त, त्यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि लोहदेखील चांगले असते, त्यामुळे त्यांचा आपल्या आहारात समावेश करावा.

आणखी वाचा :

साबुदाणे खायला आवडतात? पण या लोकांनी दोन हात लांबच रहा, नाहीतर आरोग्यावर होतील वाईट परिणाम

उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा… पोटाच्या समस्यांपासून दूर रहा

तुम्ही हर्बल चहाचं सेवन करता… मग थांबा!, ही बातमी अवश्य वाचा…

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.