पावसाच्या पाण्यामुळे टाचांना भेगा पडल्या आहेत? तर ‘हे’ घरगुती उपाय करताच मिळेल आराम
पावसाळा ऋतू सुरू झाला की त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या ऋतूत अनेकदा पायांच्या टाचांना भेगा पडतात आणि ही समस्या देखील सामान्य आहे. पावसाळ्यात सुद्धा तुमच्या टाचांना भेगा पडलेले असतील तर आजच्या लेखात आपण घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला या समस्येपासून आराम मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात.

पावसाळ्यात अनेकांना केस, त्वचा आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पावसाच्या पाण्यामुळे केस गळू लागतात. बाहेरील वातावरणामुळे त्वचा कोरडी होते आणि पावसाच्या पाण्यामुळे टाचांना भेगा पडण्याच्या समस्या अधिक निर्माण होतात. पायांच्या टाचांना भेगा पडल्याने खूप वेदना होतात आणि चालणेही कठीण होते. खरं तर, पावसाच्या पाण्यात चिखल आणि बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे टाचांना भेगा पडतात आणि ही समस्या लवकर बरी होत नाही. यामुळे खाज सुटणे आणि जळजळ होणे यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
काही लोकं या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पण जर त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ही समस्या आणखी वाढू शकते. जरी यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे आणि क्रीम उपलब्ध आहेत. पण पावसाच्या पाण्यामुळे टाचांना भेगा पडलेले असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. चला यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.
नारळ तेल वापरा
नारळाचे तेल भेगा पडलेल्या टाचांना आराम देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. नारळाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे कापणे, भाजणे आणि खाज सुटणे यासारख्या त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळविण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही टाचांच्या भागावर लावावे. ते पायांना मॉइश्चरायझ करेल आणि खाज सुटणे आणि जळजळ होण्यापासून देखील आराम देईल.
कोरफड जेल देखील एक चांगला पर्याय आहे
कोरफड त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी कोरफड जेल उपयुक्त आहे. कोरफड जेलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात, जे भेगांना बरे करण्यास मदत करते. सर्वप्रथम तुमचे पाय पूर्णपणे स्वच्छ करा आणि रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर कोरफड जेल लावा. यामुळे त्वचा लवकर बरी होईल.
कडुलिंबाच्या पानांचे पाणी आराम देईल
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे खाज सुटणे, जळजळ होणे आणि कापणे यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. जर पावसाच्या पाण्यामुळे तुमच्या टाचांना भेगा पडलेल्या असतील तर कडुलिंबाच्या पानांचे पाणी एका टबमध्ये टाका आणि त्यात तुमचे पाय 10 मिनिटे ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे जखम लवकर बरी होईल.
ट्री-ट्री ऑईल वापरा
ट्री-ट्री ऑईल देखील या समस्येपासून तुम्हाला आराम देऊ शकते. ट्री-ट्री ऑईल वापरण्यासाठी तुम्ही हे ऑईल कोणत्याही आवश्यक तेलात मिक्स करा आणि भेगा पडलेल्या भागावर लावा. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे जखमा बरे करण्यास मदत करतात आणि खाज सुटणे, जळजळ आणि संसर्गापासून आराम देतात. रात्री झोपण्यापूर्वी ट्री-ट्री ऑईलचा वापर करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
