AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या घरगुती वस्तुंचा वापर करून घरच्या घरी बनवा नैसर्गिक क्लिंझर, त्वचा होईल स्वच्छ

मेकअप काढण्यासाठी बरेचजण क्लिंझर वापरतात. पण यासाठी तुम्ही घरगुती उपायांचाही अवलंब करू शकता. घरी असलेल्या या गोष्टी मेकअप काढण्यास मदत करू शकतात. हे कसे वापरता येतील ते जाणुन घेऊयात...

या घरगुती वस्तुंचा वापर करून घरच्या घरी बनवा नैसर्गिक क्लिंझर, त्वचा होईल स्वच्छ
These homemade makeup removerImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 13, 2025 | 12:14 PM
Share

सणवार असो किंवा कोणताही कार्यक्रम प्रत्येक महिला व मुली मेकअप करतातच. प्रत्येकीला वाटते की आपले सौंदर्य आणखीन खुलून उठावे यासाठी मेकअप केला जातो. मेकअप केल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मेकअप रिमुव्ह करणे. यासाठी प्रत्येकजण मेकअप काढण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले मेकअप रिमुव्हर तसेच क्लिंझर यांचा मोठ्‌या प्रमाणात वापर करतात. परंतू प्रत्येक वेगवेगळ्या क्लिंझरमध्ये अनेक प्रकारे कॅमिकलचा वापर करतात. त्यामुळे त्यांचा दररोज वापर केल्याने त्वचेलाही नुकसान होऊ शकते.

मेकअप काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील वापरू शकता. घरी उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक गोष्टी त्वचेवरील मेकअप काढून टाकण्यास तसेच त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करू शकतात. चला तर मग जाणुन घेऊयात या घरगुती उपायांबद्दल.

गुलाब पाणी आणि जोजोबा तेल क्लिंझर

एक चमचा गुलाबपाण्यात समान प्रमाणात जोजोबा तेल मिक्स करा. यानंतर तयार झालेले घरगुती क्लिंझर कापसावर घेऊन याचा वापर मेकअप काढण्यासाठी करा. यामुळे तुमच्या त्वचेलाही नुकसान होणार नाही. कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हे विशेषतः चांगले असेल. गुलाबपाणी चेहरा हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि जोजोबा तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.

गुलाब पाणी आणि कोरफड जेल क्लिंझर

गुलाबपाणी आणि कोरफडीचे जेल दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. गुलाबपाणी त्वचेला थंडावा देते. तर कोरफडीचा जेल त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करतो. यासाठी तुम्हाला 2 चमचे गुलाबपाण्यात 1 चमचा कोरफड जेल मिसळा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात 1-2 थेंब खोबरेल तेल देखील मिक्स करू शकता. एका भांड्यात गुलाबपाणी आणि कोरफड जेल चांगले मिसळा. हे मिश्रण हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. नंतर ते ओल्या कापडाने किंवा कापसाने स्वच्छ करा. हे क्लीन्सर त्वचेला हायड्रेट करते आणि मेकअप सहजपणे काढण्यास मदत करते.

कच्चे दूध क्लिंझर

कच्चे दूध हे एक नैसर्गिक क्लिंझर आहे. हे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि मेकअप सहजपणे काढण्यास मदत करते. 1-2 चमचे कच्चे दूध घ्या. कापसाच्या साहाय्याने कच्च दुध घेऊन ते हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि मेकअप स्वच्छ करा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी हे अधिक फायदेशीर घरगुती क्लिंझर आहे.

खोबरेल तेल क्लिंझर

मेकअप काढण्यासाठी देखील नारळ तेलाचा वापर केला जातो. यासाठी कापसावर खोबरेल तेल घेऊन हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा. खोबरेल तेल मेकअप काढण्यास मदत करू शकते, तसेच खोबरेल तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. अशा परिस्थितीत, कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी ते योग्य ठरेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.