Vastu Tips | घरात चुकूनही लावू नका ‘ही’ रोपं, अन्यथा होऊ शकते नुकसान!

Vastu Tips | घरात चुकूनही लावू नका ‘ही’ रोपं, अन्यथा होऊ शकते नुकसान!

स्वतःचे घर बंधणे हे आपल्या सगळ्यांचेच स्वप्न असते. मात्र, हे स्वप्नवत घर बांधून झाल्यावर आणखी चिंता वाढू लागतात.

Harshada Bhirvandekar

|

Jan 02, 2021 | 10:44 AM

मुंबई : स्वतःचे घर बंधणे हे आपल्या सगळ्यांचेच स्वप्न असते. मात्र, हे स्वप्नवत घर बांधून झाल्यावर आणखी चिंता वाढू लागतात. अनेकदा घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार घरात काही उपाय केल्यास या समस्यांचे निवारण होऊ लागते. तुम्हालाही अशा वास्तू समस्या असतील, तर त्या दूर करण्यासाठी आपण काही झाडे आणि वनस्पतींची मदत घेऊ शकता. या वनस्पतींमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता असते. आज आम्ही तुम्हाला अशा रोपं आणि वनस्पतींविषयी सांगणार आहोत (These Plants and trees brings vastu dosh problems in your home).

वास्तुशास्त्रानुसार झाडे आणि घरे

– उंच आणि लाल फळ देणारे वृक्ष सूर्याशी संबंधित आहेत, असे मानले जाते.

– ओक आणि इतर दूधजन्य वनस्पती चंद्राशी संबंधित आहेत.

– घरात तुळशीचे रोप असल्यास, ते अनेक वास्तूदोष दूर करते.

– घरात कधीही कोरडे किंवा काटेरी झाडे ठेवू नये.

– घरात कोरडे, शुष्क किंवा काटेरी झाडे असल्यास त्यामुळे आपल्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

– घरात जांभळ्या रंगाची झाडे किंवा रोपे लावली, तर आर्थिक परिस्थिती सुधारते.

– घराच्या उत्तरेस लिंबाचे झाड लावल्याने डोळ्यांचे आजार उद्भवतात.

– घराच्या ईशान्य किंवा उत्तरेकडे केळीच्या झाडाची लागवड केल्यास, घरात आनंद, शांती आणि समृद्धी नांदते.

अशोकाच्या झाडाचा ‘वास्तू’ फायदा

– घराबाहेर अशोक वृक्षाची लागवड केल्यास आपल्या कुटुंबात समृद्धी येते.

– अशोकाच्या झाडामुळे कुटुंबात ‘शोक’ वातवरण निर्माण होत नाही.

– हे झाड आपल्या घरातील व्यक्तींमध्ये परस्परासंबंधित प्रेम निर्माण करून, नाते आणखी मजबूत करते.

घरातील तुळशीचे रोप ‘वास्तू’साठी लाभदायी!

– घरात तुळशीची रोपे ठेवणे खूप शुभ मानले जाते.

– तुळशीच्या रोपाची लागवड घराच्या फक्त उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्वेकडील दिशेत करावी.

– तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते (These Plants and trees brings vastu dosh problems in your home).

घरात एकतरी ‘मनी प्लांट’ असावा!

– घरात मनी प्लांट लावणे देखील खूप शुभ मानले जाते.

– ही वनस्पती घराच्या उत्तर किंवा दक्षिण-पूर्व दिशेने लावली पाहिजे.

– मनी प्लांटद्वारे देवी लक्ष्मीची अपार कृपा, आपल्या घरावर आणि कुटुंबावर राहते, असे मानले जाते.

घरात पिंपळाचे झाड लावू नका.

– घरात पिंपळाचे झाड लावू नये. पिंपळाचे झाड घरात लावणे अशुभ मानले जाते.

– घरात पिंपळाचे झाड लावल्याने आर्थिक नुकसान होते, असे म्हटले जाते.

घरात काटेरी झाडे लावू नये.

– आपण आपल्या घरात काटेरी झाड लावणे कटाक्षाने टाळावे.

– घराच्या दक्षिणेकडील पाकड आणि काटेरी झाडांमुळे अनेक आजार उद्भवतात.

– घरात ‘कॅक्टस’ लावल्याने आर्थिक समस्या उद्भवतात, असे म्हटले जाते.

– गुलाबाच्या वनस्पती व्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक उर्जा निर्माण करतात.

(These Plants and trees brings vastu dosh problems in your home)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें