AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Food | हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात ‘या’ पाच गोष्टींचा समावेश करा!

देशात सध्या थंडीचा कडाका पडला आहे. थंडीपासून वाचण्यासाठी आपण स्वेटर जर्किन मफलर याचा वापर सध्या आपण करत आहोत.

Winter Food | हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात 'या' पाच गोष्टींचा समावेश करा!
| Updated on: Jan 02, 2021 | 10:09 AM
Share

मुंबई : देशात सध्या थंडीचा कडाका पडला आहे. थंडीपासून वाचण्यासाठी आपण स्वेटर जर्किन मफलर याचा वापर करत आहोत. कारण थंडीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. हिवाळ्यात सर्दी, ताप, सांधेदुखीचा त्रास वाढतो. मात्र, हिवाळ्यात फक्त उबदार कपडे घालणे पुरेसे नाही. आपल्याला आहारात काही गोष्टी समाविष्ट करणे आवश्यक आहे. ज्यामुळे आपले शरीर उबदार राहील आणि रोगप्रतिकार शक्ती वाढेल. (Include it in the diet to boost immunity in winter)

कमी तापमानामुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते प्रतिकारशक्ती वाढीमुळे आपण सर्दी, फ्लू आणि कोरोनाव्हायरससारखे आजार टाळू शकतो. चला तर मग बघूयात असे कुढले पदार्थ आहेत जे आपली प्रतिकारशक्ती वाढवते.

आवळा आवळा एक असा आहे ज्यामध्ये जीवनसत्त्वे भरपूर मिळतात. आवळ्यामध्ये जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते. रोज आवळा खाल्याने तुम्ही बर्‍याच आजारांपासून मुक्त होऊ शकता. आवळा हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवळ्याचा रस करून तुम्ही पिऊ शकता किंवा तसाच खाऊ शकतात. जर रोज सकाळी रिकाम्या पोटी आपण कच्चा आवळा खाल्लातर तुम्ही बऱ्याच आजारांपासून दुर राहू शकता.

पौष्टिक अन्न हिवाळ्यात बाहेरचे काही खाण्याऐवजी घरात पौष्टिक आहार घ्या. हिवाळ्यात आहारात कॉर्न, मका आणि बाजरी यांचा समावेश करा. पौष्टिक आहार तुमचे पचन मजबूत करते. आपल्या आहारात जास्त प्रथिने, फायबर आणि लोह असणे आवश्यक आहे. या गोष्टींचा आहारात समावेळ केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तुमचे वजन कमी होते.

गूळ हिवाळ्यात गूळ खाण्यामुळे आपणा बर्‍याच आजारांपासून दूर राहू शकतो. गूळामध्ये आयरन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक घटक असतात त्यामुळे गूळ खाल्ला पाहिजे. त्याचप्रमाणे गूळापासून तयार केलेली पदार्थ हिवाळ्यात जास्तीत जास्त खाल्ले पाहिजेत.

डिंक लाडू हिवाळ्यात डिंक लाडू खाल्ले पाहिजेत. हे लाडू तुमचे शरीर आतून गरम ठेवतात. या लाडूमध्ये डिंक आणि विविध प्रकारचे किसमिस वापरून तयार केले जातात.

तूप बहुतेक लोकांचा असे वाटते की, तूप खाल्लाने आपले वजन वाढवते. पण खरं म्हणजे तूप आपल्या रोजच्या खाण्याचा महत्वाचा भाग आहे. तूपात व्हिटॅमिन ए, के, ई असते. तूप खाल्लांने आपले केस, त्वचा आणि पाचक प्रणाली निरोगी ठेवते. यामुळे तूपाचे सेवन केले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Apple Cider Vinegar | सफरचंदाचे व्हिनेगर पिणे आरोग्यवर्धक? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…

हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…

(Include it in the diet to boost immunity in winter)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.