AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अँटी-एजिंग, सुरकुत्या होतील कमी, महागड्या ट्रीटमेंटचा इफेक्ट देणार ‘हे’ घरगुती फेसपॅक

तुम्हालाही तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवायची आहे का? मग बाजारात मिळणारी महागडी स्किन केअर प्रोडक्ट वापरण्याऐवजी हे फेस पॅक घरीच बनवा. चला या फेसपॅकबद्दल जाणून घेऊयात.

अँटी-एजिंग, सुरकुत्या होतील कमी, महागड्या ट्रीटमेंटचा इफेक्ट देणार 'हे' घरगुती फेसपॅक
face packImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 22, 2026 | 2:39 PM
Share

वाढत्या उष्णतेचा पारा लक्षात आपण प्रत्येकजण आरोग्याची काळजी घेण्यास सुरूवात करतो.‍ त्यानुसार आहारात देखील आपण बदल करतोच. त्याच बरोबर उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ही प्रत्येकाची पहिली चिंता असते. तीव्र उष्णता, घाम आणि उन्हामुळे त्वचेची चमक कमी होते. निरोगी आणि चमकदार त्वचा टिकवण्यासाठी केवळ त्वचेची बाहेरून काळजी घेणे पुरेशी नाहीये. त्यासाठी त्वचेच्या अंतर्गत काळजी घेणे देखील आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार त्वचेचे सौंदर्य केवळ बाह्य घटकांवरच नाही तर अंतर्गत आरोग्य, योग्य आहार आणि योग्य काळजी यावरही अवलंबून असते.

एवढेच नाहीतर आयुर्वेदात सौंदर्य हे शरीराच्या संतुलनाशी जोडलेले आहे. शरीर हे तंदुरस्त असले की त्याची चमक चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते. वाढत्या वयानुसार चेहऱ्याच्या अनेक समस्या दिसू लागतात. आहार आणि स्किन केअरमध्ये बदल करून या समस्यांपासून सुटका मिळवणे सोपे आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या महागड्या, केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करा. तर यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही डाळींचे फेस पॅक आणि जायफळाचे फेस पॅक समाविष्ट करू शकता. चला तर मग या घरगुती फेसपॅक बद्दल जाणून घेऊयात.

त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी घरगुती फेस पॅक

मसूर डाळीचा फेस पॅक

उन्हाळ्यात त्वचा काळवंडते तर ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही मसुर डाळ हलकी भाजून घेऊन मिक्समध्ये बारीक करून घ्या. आता यात हळद, दूध आणि मुलतानी माती मिक्स करून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. आता हा फेसपॅक पुर्णपणे सुकल्यावर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि पॅक काढून टाका. यामुळे चेहऱ्यावरील खोलवरची घाण स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर चमक येईल.

केशर आणि जायफळाचा फेस पॅक

उन्हाळ्यात चेहऱ्यावर केशर आणि जायफळाचा पॅक लावल्यास उत्तम परिणाम मिळतो. यासाठी केशर दुधात भिजवून जायफळ वाटून टाका. या मिश्रणात थोडे बेसन टाका आणि पेस्ट बनवा. आता तयार पेस्‍ट चेहऱ्यावर लावा. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा लावू शकता. जायफळ थेट चेहऱ्यावर लावणे टाळा. जायफळाचा वापर करतातना‍ त्याची पूड एखाद्या घटकात मिक्स करून वापरा. कारण जायफळ थेट लावल्याने ​​त्याच्या उष्णतेमुळे त्वचेची स्किन निघू शकते.

बाह्य सौंदर्याइतकेच आंतरिक सौंदर्यही महत्त्वाचे आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्या आहारात भरपूर पाणी, बीट, ताजी फळे, आवळा आणि डाळिंब यांचा समावेश करा. दुधासोबत खारट पदार्थ, तसेच दही आणि गोड फळांसोबत आंबट फळे यांसारखे पदार्थ खाणे टाळा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!