AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोंब आलेला कांदा फेकून देता? थांबा! त्याचे ‘हे’ फायदे वाचून तर पहा

घरातल्या कांद्याला कोंब फुटले की तुम्ही काय करता? बहुतेक जण तो खराब झाला समजून फेकून देतात, नाही का? मोड आलेली कडधान्यं आपण आवडीने खातो, पण कांद्याच्या कोंबाकडे मात्र दुर्लक्ष करतो! पण थांबा! तुम्हाला माहितीय का, की हाच कोंब आलेला कांदा म्हणजे आरोग्याचा एक छुपा खजिना असू शकतो?

कोंब आलेला कांदा फेकून देता? थांबा! त्याचे 'हे' फायदे वाचून तर पहा
कोंब आलेला कांदा Image Credit source: TV9 Telugu
| Edited By: | Updated on: May 07, 2025 | 3:30 PM
Share

घरात ठेवलेला कांदा थोडासा फुटला की आपण त्याला त्वरित बाजूला ठेवतो; पण या अंकुरणामुळेच कांद्यातील पोषक तत्त्वांचे प्रमाण वाढते. स्प्राउट झालेला कांदा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध होतो, फायबर सक्रिय होते आणि नैसर्गिक एन्झाइम्स पचनास मदत करतात. चला, कोंब आलेल्या कांद्याचे आरोग्यदायी फायदे समजून घेऊया आणि त्याला रोजच्या जेवणात कसे वापरता येईल ते पाहूया.

पोषक तत्वांचा ‘खजिना’ होतो दुप्पट!

जेव्हा कांद्याला कोंब फुटतो, तेव्हा त्याच्या आतमध्ये काही रासायनिक बदल होतात. यामुळे त्याच्यातील काही पोषक तत्वांची पातळी वाढते.

अँटीऑक्सिडंट्सचा पॉवर-बूस्ट: सामान्य कांद्याच्या तुलनेत कोंब आलेल्या कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील Free Radicals नावाच्या हानिकारक घटकांशी लढतात. यामुळे कॅन्सर, हृदयाचे आजार आणि Premature Aging यांसारख्या समस्यांचा धोका कमी होण्यास मदत मिळते.

पचनक्रिया सुधारते: कोंब फुटण्याच्या प्रक्रियेत कांद्यामधील नैसर्गिक एन्झाइम्स आणि फायबर अधिक सक्रिय होतात. त्यामुळे कोंब आलेला कांदा पचायला हलका असतो. जर तुम्हाला गॅस, अपचन किंवा पोट जड वाटण्याचा त्रास होत असेल, तर आहारात कोंब आलेल्या कांद्याचा समावेश करणे फायद्याचे ठरू शकते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते: कोंब आलेल्या कांद्यामध्ये Anti-bacterial गुणधर्मही वाढतात, जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. बदलत्या हवामानात किंवा साथीच्या काळात आहारात याचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

ब्लड शुगर नियंत्रणात मदत: काही अभ्यासांनुसार, कोंब आलेल्या कांद्यामध्ये असलेले Sulfur Compounds आणि Quercetin सारखे Flavonoids रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. तसेच, यामुळे पोट भरल्याची भावना जास्त काळ टिकते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही अप्रत्यक्षपणे मदत होऊ शकते.

कसा कराल वापर?

कोंब आलेला कांदा तुम्ही सामान्य कांद्याप्रमाणेच वापरू शकता. तो भाजी, आमटी, सॅलड किंवा इतर पदार्थांमध्ये चवीसाठी घालू शकता. त्याचा कोंब असलेला हिरवा भागही खाण्यासाठी वापरता येतो, जो अनेकदा आपण कांद्याच्या पातीप्रमाणे वापरतो.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.