AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक ठिकाणी सहज रुळण्यासाठी तुमच्या बबड्याला नक्की ‘हे’ टेबल मॅनर्स शिकवा

खाण्याच्या टेबलवर योग्य वागणूक देणं हे त्यांच्या सामाजिक व वैयक्तिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया 10 अशा सोप्या पण प्रभावी पद्धती ज्या मुलांना सौम्य व सुसंस्कृत बनवतील.

प्रत्येक ठिकाणी सहज रुळण्यासाठी तुमच्या बबड्याला नक्की 'हे' टेबल मॅनर्स शिकवा
खाण्याच्या वेळी मुले कशी वागावी? जेवताना हे नियम शिकवाImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Jul 18, 2025 | 5:45 PM
Share

आजच्या वेगवान जीवनशैलीत मुलांना केवळ चांगलं शिकवणं पुरेसं नाही, तर त्यांच्यात शिष्टाचार आणि सुसंस्कृत वागणूक रुजवणंही तितकंच आवश्यक आहे. शाळा आणि अभ्यासाबरोबरच मुलांनी समाजात, खासगी कार्यक्रमांमध्ये किंवा दैनंदिन घरगुती वेळात कसं वागावं, याचे संस्कार लहान वयातच दिले पाहिजेत. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे टेबल मॅनर्स जे मुलांना केवळ सभ्य बनवत नाही, तर त्यांना कोणत्याही सामाजिक परिस्थितीत सहज मिसळायला शिकवतात.

अनेक पालक मुलांना जेवण कसं खायचं ते शिकवतात, पण ‘जेवणाची शिस्त’ म्हणजे काय, हे समजावून सांगणं विसरतात. आजचा पालक जर स्वतः जेवताना नीट बसतो, स्वच्छता ठेवतो, इतरांचा आदर करतो, तर मूलही हेच शिकतं. कारण मूल ऐकण्यापेक्षा बघून जास्त शिकतं. म्हणूनच टेबल मॅनर्सचा पाया घरातूनच घालायला हवा.

खाली दिलेल्या 10 सोप्या पद्धती तुमच्या मुलाला योग्य आचरण आणि शिष्टाचार शिकवण्यात मदत करतील:

1. नीट बसणं शिकवा – जेवताना सरळ बसणं, खुर्चीवर झुकून न बसणं आणि पाय लटकवणं टाळणं ही गोष्टी शारीरिक आणि सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

2. वाट पाहणं – मूल कितीही भुकेलं असलं, तरी जेवण उठवताना इतरांची वाट पाहणं, हे सहकार्याचं लक्षण आहे.

3. चमचा, काटा योग्य रितीने वापरणं – मुलाला वयाच्या योग्य टप्प्यावर चमचा कसा धरायचा, अन्न कसं कापायचं, हे शिकवणं अत्यंत गरजेचं आहे.

4. स्वच्छतेची सवय लावा – जेवणाआधी हात आणि तोंड धुणं, स्वच्छ राहणं ही सवय लहानपणापासूनच रुजवावी.

5. सर्वांसोबत जेवण करायला शिकवा – एकत्र जेवणं हे केवळ परंपरा नसून, सामूहिकतेचा आणि सौहार्दाचा परिचय असतो.

6. तोंड बंद करून जेवणे – बोलता-बोलता जेवण करणं किंवा तोंड उघडं ठेवून चावणं हे अशिष्ट वाटतं; याची जाणीव मुलाला करून द्या.

7. इतरांना मदत करायला शिकवा – पाणी किंवा पदार्थ हवा असेल, तर विनम्रपणे देणं, “प्लीज” आणि “थँक यू” वापरणं शिकवा.

8. अन्नाचा अपमान नको – एखादा पदार्थ आवडला नाही, तरी त्याचा उपहास करणं चुकीचं आहे. अन्न बनवणाऱ्याचा सन्मान करणं शिकवा.

9 आपली भांडी स्वतः उचलणे – जेवणानंतर आपली भांडं किचनमध्ये नेणं ही सवय मुलाला जबाबदार बनवते.

10. जेवण म्हणजे खेळ नाही – प्लेटमध्ये अन्नाशी खेळ करणं चुकीचं आहे. अन्नाकडे आदराने पाहणं गरजेचं आहे.

मोठ्या मुलांसाठी काही अतिरिक्त सवयी :

फोन किंवा टीव्ही बाजूला ठेवून जेवणात सहभागी व्हा, नैपकिन कसा वापरायचा हे शिकवा, आणि टेबल लावताना मदत घेणं, ही देखील जबाबदारीची पावलं आहेत.

कशा सवयी टाळाव्यात?

अकेले जेवण, टीव्हीसमोर किंवा मोबाईलवर बघत जेवण, जबरदस्तीने अन्न खाणं, आणि चावताना आवाज करणं या सवयी टाळायला हव्यात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....