नवी दिल्ली: भारत हा सर्वात सुंदर असा देश आहे. निसर्गाने समुद्ध असा हा देश आहे. त्यामुळे आपल्या देशातील अनेक स्थळांना पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येत असतात. निसर्गाचा आनंद लुटत असतात. पण आपल्या देशात अशा काही जागा आहेत की तिथे जाणं मना आहे. कारण ही स्थळं अत्यंत खरतनाक मानली जातात. या ठिकाणी जे जातात ते परत येतच नाहीत, असं सांगितलं जातं. कारण यातील बरीचशी ठिकाणं निर्जनस्थळं आहेत. निर्जनस्थळ कोणतंही असो ते घातकच असतं. त्यामुळे तुम्हीही अशा ठिकाणी जाणार असाल तर खबरदारी घेऊनच जा. कुणाला तरी सांगून जा. नाही तर शक्यतो अशा निर्जनस्थळी जाणं टाळाच.