AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी बजेटमध्ये सोलो ट्रिप करायची आहे? तर ‘हे’ हिल स्टेशन्स आहेत तुमच्यासाठी योग्य पर्याय

तुम्हाला जर प्रवासाची आवड असेल आणि कमी बजेटमध्ये एकट्याने ट्रिपला जायचे असेल तर काळजी करू नका. कारण भारतात अशी अनेक हिल स्टेशन्स आहेत जी त्यांच्या सौंदर्यासाठी, शांततेसाठी आणि कमी खर्चात उत्तम अनुभवासाठी ओळखली जातात. चला तर मग आजच्या या लेखात आपण अशा काही हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत जेथे तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही आणि तुम्ही निसर्गाचा आनंद देखील घेऊ शकाल.

कमी बजेटमध्ये सोलो ट्रिप करायची आहे? तर 'हे' हिल स्टेशन्स आहेत तुमच्यासाठी योग्य पर्याय
hill stations for solo tripImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jun 24, 2025 | 2:08 AM
Share

रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना फिरायला जाण्यासाठी वेळ खूप कमी मिळातो. तसेच कुटूंबासोबत किंवा मित्रांसोबत ट्रिपला जाण्यासाठी बजेट पुरेस नसले की अनेकदा ट्रिप पुढे ढकली जाते. पण आजच्या काळात एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड आहे. तर याला सोलो ट्रिप असे म्हणतात. यामुळे लोकं त्यांच्या आवडीच्या ठिकाणी एकट्याने ट्रिपसाठी जाऊ शकतात. तसेच यामध्ये तुमच्याकडे जर वेळ आणि पैसा मर्यादित असेल तर सोलो ट्रिप तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुम्हीही सोलो ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आपल्या भारतातील या सुंदर हिल स्टेशन्सला व ठिकाणांना भेट देऊ शकतात. त्यासोबत कमी बजेटमध्येही तुम्हाला या सोलो ट्रिपचा आंनद लुटता येईल. चला तर मग आजच्या या लेखात आपण या ठिकाणांची नावे जाणून घेऊयात…

– मॅकलिओडगंज हे हिमाचल प्रदेशातील सुंदर हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन एकट्या प्रवाशांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथील तिबेटी संस्कृती, शांत मठ आणि ट्रायंड ट्रेक सारख्या ॲक्टिव्हिटी मनाला शांत करतात. येथील कॅफे संस्कृती आणि बजेट-फ्रेंडली हॉस्टेल यामुळे एकट्याने प्रवास करणे सोपे करतात. येथे राहण्यासाठी 1 दिवसासाठी 1000 ते 1500 रुपये खर्च होईल.

– ज्यां लोकांना प्रवासात शांती आणि रोमांच असे दोन्ही हवे आहे त्यांच्यासाठी ऋषिकेश हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. गंगा आरती, योगा वर्ग आणि रिव्हर राफ्टिंग सारख्या ॲक्टिव्हिटीमुळे खास बनते. येथील सकारात्मक वातावरण आणि एकट्या प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण हे खूप लोकप्रिय ठरते. तसेच ऋषिकेश हे ठिकाण स्वस्त देखील आहे. येथे तुम्हाला राहण्यासाठी आणि जेवणासाठी अनेक बजेट फ्रेंडली गोष्टी मिळतील.

– जिभी हे हिमाचल प्रदेशातील एक ऑफबीट हिल स्टेशन आहे, जिथे लाकडी होमस्टे, घनदाट जंगले आणि धबधब्यांमध्ये ट्रेकिंग करणे हा एक अनोखा अनुभव तुम्हाला घेता येतो. रोजच्या कामाच्या ताणातून दूर असलेले हे गाव एकट्या प्रवाशांसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. तसेच, येथील जेवण खूपच स्वस्त आहे आणि तुम्हाला कमी पैशात राहण्यासाठी खोली मिळू शकते. एका दिवसाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही येथे 1000 ते 1500 रुपयांमध्ये एक दिवस राहू शकता.

– लॅन्सडाउन हे उत्तराखंडमधील एक शांत आणि अतिशय स्वच्छ हिल स्टेशन आहे ज्याची देखभाल भारतीय सैन्य करते. टिप इन टॉप, वॉर मेमोरियल आणि जंगल वॉक सारख्या उपक्रमांमुळे हे ठिकाण एकट्याने प्रवास करण्यासाठी एक सुरक्षित आणि आरामदायी ठिकाण बनते. लॅन्सडाउनमध्ये एका दिवसाचे बजेट 1500-2000 हजार रुपये खर्च करावे लागतील.

-रानीखेतमधील हिरवळ, हिमालयाची झलक आणि मोकळे वातावरण यामध्ये एकट्याने प्रवास केल्याने मानसिक शांती मिळते. येथे तुम्ही कमी खर्चात मंदिरांना भेट देऊ शकता, निसर्गभ्रमणाचा आनंद घेऊ शकता आणि डोंगराळ जीवनशैलीचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण खूप सुंदर आहे आणि राहण्याची आणि जेवणाची सोय देखील खूप स्वस्त आहे. येथेही तुम्ही 2000 रुपयांमध्ये एक दिवस राहू शकतात.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.