AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना डेहराडूनमधील या ठिकाणी घेऊन जा, ट्रिप राहील संस्मरणीय

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले कुठेतरी बाहेर जाण्याचा आग्रह धरतात. अशा परिस्थितीत, पालक देखील आपल्या मुलांसोबत ट्रिपला जाण्यासाठी चांगले ठिकाण शोधतात. जर तुम्हीही या उन्हाळ्यात मुलांसोबत सहलीची योजना आखत असाल, तर आम्ही तुम्हाला डेहराडूनमधील काही सर्वोत्तम ठिकाणांबद्दल सांगत आहोत, जे मुलांसाठी भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना डेहराडूनमधील या ठिकाणी घेऊन जा, ट्रिप राहील संस्मरणीय
DehradunImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2025 | 7:19 PM
Share

उन्हाळ्याच्या सुट्ट्या काही दिवसांनी सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मुल पालकांकडे बाहेर फिरायला जाण्याचा हट्ट करतात. अशावेळेस प्रत्येक पालकांना हा विचार येतो की मुलांसाठी ट्रिपला घेऊन जाण्यासाठी योग्य ठिकाण कोणते आहे. त्यासोबत अशी कोणते ठिकाण आहे जिथे मुलांना मजा करता येईल आणि प्रवासही आरामदायी असेल. जर तुम्हीही अशा ठिकाणाच्या शोधात असाल तर डेहराडून तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. उत्तराखंडची राजधानी डेहराडून केवळ शांत वातावरण, हिरवळ आणि टेकड्यांसाठीच नाही तर अनेक साहसी ठिकाणे, नैसर्गिक सौंदर्य आणि अॅडव्हेंचर करता येणारी जागादेखील प्रसिद्ध आहे.

विशेषतः मुलांसाठी येथे मजेदार उद्याने, वन्यजीव अभयारण्ये, अॅडव्हेंचरस स्पोर्ट्स आणि सुंदर पिकनिक स्पॉट्स आहेत, जे या ट्रिपला आणखी संस्मरणीय बनवू शकतात. जर तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत एक मजेदार आणि रोमांचक ट्रिप प्लॅन करत असाल तर डेहराडूनमधील या ठिकाणांना नक्कीच भेट द्या. हे केवळ मुलांसाठी मनोरंजकच नाही तर त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि नैसर्गिक सौंदर्य जवळून अनुभवण्याची संधी देखील मिळेल. मुलांसोबत डेहराडूनमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे जाणून घेऊया.

आनंद वन, निसर्ग आणि अॅडव्हेंचरसाठी एक परिपूर्ण ठिकाण

तुम्हाला तुमच्या मुलांना घेऊन निसर्गाच्या सानिध्यात आणायचे असेल, तर आनंद वन हे एक उत्तम ठिकाण आहे. हे एक सुंदर निसर्ग उद्यान आहे, जिथे मुले हिरवळ, वाइल्डलाइफ आणि शांतीचा आनंद घेऊ शकतात. येथे नेचर वॉक , पक्षी निरीक्षण आणि मुलांसाठी मजेदार ॲक्टिविटीज आनंद घेता येईल.

भुल्ला ताल, बोटिंग आणि पिकनिक स्पॉट

तुमच्या मुलांना तलाव आणि बोटिंग करायला आवडत असेल तर त्यांना लॅन्सडाउनमधील भुल्ला ताल येथे नक्कीच घेऊन जा. हे एक सुंदर कृत्रिम तलाव आहे, जे त्याच्या स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही तुमच्या मुलांना बोटिंग करायला घेऊन जाऊ शकता. तुम्ही तलावाच्या काठावर पिकनिक करू शकता आणि त्या तलावात असलेल्या हंसांना खायला घालण्याचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण मुलांच्या मनोरंजनासाठी आणि विश्रांतीसाठी परिपूर्ण आहे.

लच्छीवाला निसर्ग उद्यान, जंगलात साहस आणि मजा

जर तुम्ही मुलांसोबत जंगलात फिरायला आणि निसर्ग सहलीची योजना आखत असाल तर लच्छीवाला नेचर पार्क हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे उद्यान हिरवळीने वेढलेले आहे आणि येथे लहान नद्या आणि नैसर्गिक पाण्याचे प्रवाह वाहतात. येथे तुम्ही ट्रेकिंग, पाण्यातील ॲक्टिविटीज आणि वाइल्डलाइफ पाहण्याचा आंनद घेऊ शकता. मुलांना निसर्ग आणि वाइल्डलाइफचा एक्सपीरियंस देण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. हे ठिकाण डेहराडूनमधील हरिद्वार रोडवर आहे.

धनौल्टी, बर्फाळ टेकड्यांचा आनंद घ्या

तुम्हाला देहरादूनपासून थोडे पुढे जाऊन थंड वारा आणि बर्फाळ दऱ्यांचा आनंद घ्यायचा असेल, तर धनौल्टी हे एक उत्तम ठिकाण आहे. मुलांना येथील शांत वातावरण आणि दाट पाइन जंगले आवडतील. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्य आणि अॅडव्हेंचर साठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही इथे आलात तर कॅम्पिंग आणि स्नो अॅडव्हेंचरचा नक्कीच आनंद घ्या.

Follow Us
NEET, नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा!
NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?