आयआरसीटीसीकडून चारधाम यात्रेसाठी विशेष टूर पॅकेज, डीलक्स एसी टुरिस्ट ट्रेन सुरु

शनिवारपासून चारधाम यात्रा सुरु झाल्यानंतर भारतीय रेल्वेच्या आयआरीसीटीसीकडून विशेष रेल्वे सुरु केली आहे. देखो अपना देश या उपक्रमांतर्गत डीलक्स एस टुरिस्ट ट्रेन सुरु करण्यात आली आहे.

आयआरसीटीसीकडून चारधाम यात्रेसाठी विशेष टूर पॅकेज, डीलक्स एसी टुरिस्ट ट्रेन सुरु
संग्रहित छायाचित्र.


नवी दिल्ली: शनिवारपासून चारधाम यात्रा सुरु झाल्यानंतर भारतीय रेल्वेच्या आयआरीसीटीसीकडून विशेष रेल्वे सुरु केली आहे. देखो अपना देश या उपक्रमांतर्गत डीलक्स एस टुरिस्ट ट्रेन सुरु करण्यात आली आहे. आयआरीसीटीनं या संदर्भात घोषा केली आहे. श्री रामायन यात्रेला यश आल्यानंतर आयआरीसीटीनं ही घोषणा केली आहे.

कशी असेल चारधामा यात्रेची टूर

चारधाम यात्रेच्या डीलक्स ट्रेन दिल्लीतील सफरदजंग येथून सुटेल. हरिद्वार, गंगा घाटावरील गंगा आरती, ऋषिकेश, लक्ष्मण झुला, त्रिवेणी घाट, अयोध्या, रामजन्मभूमी, हुनमान गढी, शरयू आरती, नंदीग्राम, वारणासी, गंगा घाट, काशी विश्वनाथ मंधीर, पुरी, जगन्नाथ मंदीर, पुरी, कोनार्क सूर्यमंदीर, चंद्रप्रभा बीच, रामेश्वरम, रामनाथस्वामी मंदीर, धानुषकोदी, द्वारका येधील द्वारकाधीश मंदीर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, शिवराजपूर , बेट द्वारका या ठिकाणी ही ट्रेन जाईल. या यात्रेचा एकूण 8500 किमीचा असेल. ही यात्रा 16 दिवस सुरु राहणार आहे.

ट्रेनमध्ये कोणत्या सुविधा असणार

स्टेट ऑफ आर्ट डीलक्स ट्रेनमध्ये दोन मोठे डायनिंग रेस्टॉरंट असतील. मॉडर्न किचन, शॉवर क्युबिक्स कोच, सेन्सर बेस्ड वॉशरूम फंक्शन, फूट मेसेंजर अशा सुविधा असणार आहेत. ही ट्रेन एसी टायर 1 आणि एसी टायर 2 अशा स्वरुपात असेल. याशिावय ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असतील. प्रत्येक कोचमध्ये एक सुरक्षा रक्षक असेल.

आयआरसीटीसनं विशेष ट्रेन सुरु केली आहे. भारत सरकारच्या देखो अपना देश उपक्रमांतर्गत देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ही ट्रेन सुरु करण्यात आली आहे. या ट्रेनसाठी एका व्यक्तीचं तिकीट 78 हजार 585 रुपये आहे.

हिमालयीन टूर पॅकेज

भारतीय रेल्वे कंपनी IRCTC ने या हिमालयीन टूर पॅकेजला गोल्डन ट्रायंगल टूर असे नाव दिले आहे. जे लोक या पॅकेजमध्ये प्रवास करू इच्छितात ते दार्जिलिंग, गंगटोक, कालिम्पोंग आणि न्यू जलपाईगुडी येथे प्रवास करू शकतील. हे टूर पॅकेज 5 रात्री 6 दिवसांसाठी आहे. ही टूर 17 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. त्याची नोंदणी आधीच सुरू झाली आहे.

किती खर्च येईल

आयआरसीटीसी टूर पॅकेजमध्ये दोन लोकांसाठी डबल शेअरिंगसाठी 28630 रुपये द्यावे लागतील. तीन लोकांसाठी 21440 रुपये म्हणजे त्रिपल शेअरिंगसाठी शुल्क आहे. चार लोकांच्या ग्रुपसाठी म्हणजेच 4 पॅक्स ग्रुपसाठी 22960 रुपये द्यावे लागतील. सहा लोकांच्या ग्रुपसाठी किंवा 6 पॅक्सच्या ग्रुपसाठी 19230 रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही मुलांसाठी वेगळा बेड घेतलात तर त्याची किंमत 7060 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

इतर बातम्या:

रेल्वेने 11 विशेष गाड्या केल्या रद्द, 12 गाड्यांचा मार्ग बदलला, पटापट यादी तपासा

25 ऑगस्टपासून ‘या’ मार्गांवर विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

IRCTC starts special Deluxe AC tourist train for Char Dham Yatra

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI