AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मसूरी नव्हे तर उत्तराखंडचं ‘हे’ सुंदर हिल स्टेशन एक्सप्लोर करा, ट्रिप होईल संस्मरणीय

हिमालयाच्या कुशीत शांत सुट्टीचा आनंद घ्यायचा आहे का? धनोल्टी हे तुमच्यासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. धनोल्टी हे मसुरीच्या अगदी जवळ चे एक छोटेसे शहर आहे. धनोल्टीमध्ये वनमार्ग, सुंदर उद्याने आणि मंदिरे ही प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे आहेत.

मसूरी नव्हे तर उत्तराखंडचं 'हे' सुंदर हिल स्टेशन एक्सप्लोर करा, ट्रिप होईल संस्मरणीय
Dhanaulti
| Edited By: | Updated on: Jan 14, 2025 | 6:36 PM
Share

उत्तराखंडमध्ये एकापेक्षा एक सुंदर हिल स्टेशन्स आहेत, परंतु गेल्या काही वर्षांपासून मसूरी, नैनीताल आणि औली सारख्या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. अशा तऱ्हेने जर तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून काही रिलॅक्स चे क्षण घेऊन रिलॅक्स ट्रिप प्लॅन करत असाल तर मसूरीपासून 62 किलोमीटर अंतरावर असलेले हे सुंदर हिल स्टेशन तुमच्यासाठी परफेक्ट स्पॉट आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांसह येथे संस्मरणीय ट्रिपचे नियोजन करू शकता.

मसूरीपासून काही अंतरावर असलेले धनोल्टी हे एक मनमोहक हिल स्टेशन आहे. अशा तऱ्हेने जर तुम्हाला मसूरी आणि औली सारख्या ठिकाणी फिरायचे नसेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. उत्तराखंडच्या गढवाल हिमालय रांगेत वसलेले धनोल्टी हिरवेगार उतार, ताजी हवा, शांतता आणि एकांत वातावरण आणि नयनरम्य पर्वतदृश्यांसाठी ओळखले जाते.

धनोल्टीला कधी जायचे?

अशातच तुम्ही इतर ऋतू देखील म्हणजे उन्हाळ्यात धनोल्टीया हिल्स स्टेशनला भेट देऊ शकतात. दरम्यान उन्हाळयात धनोल्टीचे तापमान ७ ते ३१ अंशांपर्यंत असते. रात्री थंड आणि दिवस उबदार असतात ज्यामुळे धनोल्टीमध्ये फिरण्याची ठिकाणे शोधणे सोपे होते. लहान मुले किंवा वृद्धांसोबत प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी धनोल्टीला भेट देण्यासाठी उन्हाळा हा उत्तम काळ असतो.

तसेच पावसाळा ऋतूमध्ये भरपूर पाऊस पडतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्याच्या ऋतूत धनोल्टीचे तापमान १ ते ७ अंशांच्या दरम्यान असते. धनोल्टीचे हवामान अतिशय थंड असून येथे भरपूर बर्फवृष्टी होते. जर तुम्हाला ॲडव्हेंचर आवडत असेल तर हिवाळ्याचा हंगाम तुमच्यासाठी उत्तम असतो.

धनोल्टी मधील प्रेक्षणीय स्थळे

सुरकंडा देवी मंदिर : सुरकंडा देवी मंदिर हे भाविक आणि ट्रेकर्स या दोघांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. बहुतेक पर्यटकांसाठी धनोल्टीमधील हे एक प्रमुख प्रेक्षणीय ठिकाण आहे. सती देवीला समर्पित हे पवित्र मंदिर शक्तीपीठांपैकी एक आहे.

धनोल्टी ॲडव्हेंचर पार्क : ॲपल ऑर्चर्ड रिसॉर्टमधील धनोल्टी ॲडव्हेंचर पार्क हे साहसप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. रॅपलिंग, माउंटन बाइकिंग, रॉक क्लायम्बिंग, स्काय वॉकिंग, झिप स्विंग आणि व्हॅली क्रॉसिंग सारखे ॲडव्हेंचर तुम्ही येथे करू शकतात.

जाबरखेत नेचर रिझर्व्ह : जर तुम्हीनिसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. या ठिकाणी रानफुलांच्या ३०० प्रजाती, पक्ष्यांच्या १०० प्रजाती आणि मशरूमच्या सुमारे ६० जाती आहेत. ज्या तुम्हाला एक्सप्लोर करता येतील.

धनोल्टी ला कसे पोहोचावे?

तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने प्रवास करता उत्तराखंड मधील धनोल्टी या हिल्सवर बाय रोड देखील जाऊ शकता. अशा तऱ्हेने जर तुम्ही धनोल्टीच्या रोड ट्रिपचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी डेहराडून-मसूरी मार्ग किंवा ऋषिकेश-चंबा मार्गाचा अवलंब करू शकता. पण जर तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन डेहराडून मध्ये आहे, जे धनोल्टीपासून 60 किमी दूर आहे. याशिवाय ऋषिकेश रेल्वे स्थानक धनोल्टीपासून ८३ किमी अंतरावर आहे. जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर डेहराडूनचा जॉली ग्रांट विमानतळ सर्वात जवळ आहे. इथून धनोल्टीला टॅक्सी घेऊन जाऊ शकता.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा