AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हामुळे काळवंडलेला चेहरा टवटवीत दिसण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच उपलब्ध असलेल्या या घटकांपासून फेसपॅक तयार करा, ज्यामुळे उन्हामुळे टॅन झालेला चेहरावरील चमक पुन्हा येईल. चला तर काळवंडलेला चेहरा चमकदार होण्यासाठी कोणत्या घरगुती उपायांचा अवलंब करायचा ते जाणून घेऊयात.

उन्हामुळे काळवंडलेला चेहरा टवटवीत दिसण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
टवटवीत दिसण्यासाठी करा 'हे' घरगुती उपायImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 2:05 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणारे ऊन यामुळे स्किन टॅनिंग होत आहे. त्यामुळे या समस्येशी सर्वांना सामोरे जावे लागतेय. त्यासोबतच सुर्याच्या तेजस्वी किरणांमुळ त्वचेला अनेक प्रकारे नुकसान होत असते. अशातच या प्रखर उन्हात कामावर किंवा शाळेत जात असताना स्किन टॅनिंग होते. अशातच स्किन केअर करताना कितीही महाग प्रोडक्ट्स वापरले तरीही टॅनिंगमुळे तुमचा चेहरा निस्तेज दिसू शकतो. जर तुम्हालाही टॅनिंग काढून तुमचा चेहरा टवटवीत फ्रेश चमकदार दिसायला पाहिजे तर यासाठी फक्त तुमच्या स्वयंपाकघरातील या घटकांचा वापर करा. यासाठी जास्त मेहनत किंवा खर्च लागणार नाही. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात टॅनिंग दुर करण्यासाठी स्वयंपाकघरातील कोणत्या घटकांचा वापर करावा लागेल आणि ते कसे वापरायचे.

चेहऱ्यावरील काळवंडलेले डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय

स्वयंपाकघरातील या घटकांचा करा वापर

साहित्य :

1 चमचा चंदन पावडर

1 चमचा कॉफी पावडर

चिमूटभर हळद

1 किंवा 2 मोठे चमचे दूध

घरगूती फेसपॅक बनवण्याची आणि चेहऱ्याला लावण्याची योग्य पद्धत:

एका वाटीत चंदनाची पावडर आणि कॉफी मिक्स करा. त्यात हळद मिक्स करून घ्या. आता घट्ट पेस्ट बनवण्यासाठी हळूहळू दूध मिक्स करा. आता तयार पॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटे तशीच राहू द्या. हा पॅक सुकल्यावर हात थोडा ओला करून हलक्या हातानी मालिश करा, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही योग्य प्रमाणात आणि आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर हा पॅक लावल्याने काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होईल.

फेसपॅक मधील घटाकांचा त्वचेला होणारे फायदे

  • चंदनामधील घटक त्वचेला आराम देतात.
  • कॉफीमधील गुणधर्म त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्याचे काम करतात.
  • तसेच हळदीमध्ये असलेले जिवाणूविरोधी गुणधर्म डाग काढून टाकण्यास मदत करतात.
  • दुधामधील लॅक्टिक ॲसिड, जीवनसत्त्वे आणि प्रथिने त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....