AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असतात या तीन गोष्टी, त्याला पृथ्वीवरच होते स्वर्गाची प्राप्ती, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ तसेच कुटनीती तज्ज्ञ हेते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाच्या आयुष्यात सुख म्हणजे नक्की काय असतं? हे सांगताना चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये म्हटलं आहे की, या जगात तीन गोष्टी अशा आहेत, त्या जर एखाद्याच्या आयुष्यात असतील तर त्या माणसाला पृथ्वीवरच स्वर्गाची प्राप्ती होते.

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असतात या तीन गोष्टी, त्याला पृथ्वीवरच होते स्वर्गाची प्राप्ती, चाणक्य काय म्हणतात?
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 25, 2026 | 9:02 PM
Share

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणूस आपल्या जन्मापासू ते मरेपर्यंत सुखाच्या मागे पळत असतो, मात्र खरं सुख काय आहे? याचा त्याला आयुष्यभर शोध लागत नाही. जे लोक आपल्या आयुष्यात समाधानी नसतात असे लोक कधीच सुखी होऊ शकत नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर तुम्ही समाधानी व्हायला शिकलं पाहिजे, तसेच तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीत देखील आनंद शोधता आला पाहिजे. परंतु या व्यतिरिक्त देखील या जगात अशा तीन गोष्टी आहेत, त्या जर एखाद्या व्यक्तीकडे असतील तर तो या जगातील सर्वात सुखी माणूस असतो. अशा व्यक्तीला पृथ्वीरच स्वर्गाची प्राप्ती होते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? आणि या तीन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल.

अज्ञाधारी संतान – चाणक्य म्हणतात ज्या आई -वडिलांच्या पोटी अज्ञाधारी संततीची प्राप्ती होते, असे आई वडील हे जगातील सर्वात श्रीमंत आई वडील असतात. अशा आई वडिलांना जीवंतपणीचं स्वर्गाची प्राप्ती होते. मुलाला मोठं कारण्यासाठी आई वडिलांनी प्रचंड कष्ट केलेले असतात. त्यामुळे म्हातारपणात मुलाने आपल्या आई-वडिलांचा चांगला सांभाळ करावा हे मुलांचं कर्तव्य असतं. त्यामुळे अशी मुलं ज्या आई-वडिलांच्या पोटी जन्माला येतात ते आईवडील भाग्यवान असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

समजूतदार पत्नी – चाणक्य म्हणतात पती -पत्नी हे संसाररूपी रथाची दोन चाकं असतात. त्यामुळे ती समान गतीने धावणे अपेक्षित असतात. जर त्यातील एक चाक जरी मागे पुढे झालं तर संसार जास्त दिवस टिकणार नाही. ज्या घरात सतत पती-पत्नीचे भांडणं होतात, अशा घराला कधीही आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला समजूतदार पत्नी भेटते, किंवा पत्नीला समजूदात पती भेटतो, तेव्हा असं घर हे स्वर्ग होतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

समाधान – चाणक्य म्हणतात की तुमच्याकडे जी संपत्ती आहे, किंवा तुम्ही कष्ट करून जे काही कमावलं आहे, त्यात जर तुम्ही समाधानी असाल तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी ही पृथ्वीच स्वर्ग आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला