आता मेकअपने डार्क सर्कल्स लपवण्याची गरज नाही, या उपायांनी कायमचे दूर होतील काळे डाग
जर डार्क सर्कलमुळे तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य बिघडत असेल तर तुम्ही घरगुती उपाय करून त्यापासून मुक्ती मिळवू शकता. कमी झोप घेतल्याने हा त्रास वाढू शकतो, त्यामुळे रात्री पुरेशी झोप घेण्याचाही प्रयत्न करा.

Dark Circle Removal Tips : डोळ्यांखाली येणारे डार्क सर्कल्स (Dark Circle) ही आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यातील बाधा ठरतात. अचानकच उगवणारी ही वर्तुळे चेहऱ्याचा पोचही बिघडवतात. रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने डोळ्यांखाली ( not getting enough sleep) अनेकदा डार्क सर्कल्स तयार होतात. मेकअप आणि कन्सीलरच्या मदतीने महिला तर ही डार्क सर्कल्स लपवू शकतात परंतु पुरुषांना तसे करणे शक्य नसते. जर त्वचा संवेदनशील असेल तर मेकअपमुळे दुष्परिणाम होऊ शकतात.
पण काही घरगुती उपायांच्या मदतीने डोळ्यांच्या खालची ही डार्क सर्कल्स (Dark Circle Removal Tips) घालवता येऊ शकतात.
कोल्ड टी बॅग्स
जर तुम्हाला डार्क सर्कल्सपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही कोल्ड टी बॅगचाही वापर करू शकता. तुम्ही ग्रीन टी किंवा कॅमोमाइल टी बॅग वापरू शकता. चहामध्ये असलेले कॅफिन रक्तवाहिन्या विस्तारण्याचे काम करते असे मानले जाते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि डार्क सर्कल्सची समस्या कमी होऊ शकते. जर तुम्हाला यांचा वापर करायचा असेल तर प्रथम टी बॅग पाण्यात बुडवून ठेवा आणि नंतर ती थंड करण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यानंतरती दररोज दोन्ही डोळ्यांवर ठेवावी. नियमित वापराने फरत दिसून येईल.
काकडी किंवा बटाट्याचा कीस
बटाटा किंवा काकडी यांचा वापर केल्याने डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे आणि सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. या दोन्ही पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आढळतात. याच्या मदतीने डार्क सर्कलचे मिटवू शकतो. एवढेच नाही तर डोळ्यांच्या आजूबाजूला सूज आली असेल तर तीही कमी होऊ शकते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी रोज किसलेला बटाटा किंवा काकडीचे काप डोळ्यांवर लावा. साधारण 10 मिनिटांनी तुमचे डोळे साध्या पाण्याने धुवा.
गार दूध
गरम दूध जेवढे आरोग्यासाठी फायदेशीर असते तितकंच गार दूध हे डोळ्यांसाठी फायदेशीर असते. ते डार्क सर्कल्स हटवण्यास मदत करते. थंड दूध हे डोळ्यांसाठी एक प्रकारचे नैसर्गिक क्लींजर आहे, जे डोळ्यांच्या आजूबाजूच्या संवेदनशील त्वचेला आराम देऊ शकते. थंड दुधात लॅक्टिक ॲसिड आढळते, ज्यामुळे जळजळ कमी होते आणि त्वचेचा रंग उजळतो. दुधात असलेले पोटॅशियम त्वचेला मुलायम बनवते. कापसाचा गोळा थंड दुधात बुडवून काही वेळ डोळ्यांवर किंवा आजूबाजूच्या भागावर ठेवा. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. डार्क सर्कल्सचा त्रास कमी होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
