मुरुमांच्या समस्येने त्रस्त आहात? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा…

धूळ आणि प्रदूषण याचा सरळ परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. यामुळे चेहऱ्याचा अनेक समस्या निर्माण होतात.

मुरुमांच्या समस्येने त्रस्त आहात? मग, 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा...
आपल्या खाण्याच्या सवयी, वातावरण आणि शरीरात होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात. यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स अर्थात मुरूम येतो. चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण घरगुती उपाय करू शकतो.
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 11:41 AM

मुंबई : धूळ आणि प्रदूषण याचा सरळ परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. यामुळे चेहऱ्याचा अनेक समस्या निर्माण होतात. अनेक आैषधे घेऊन सुध्दा त्वचेचा समस्या दूर होत नाहीत. त्यामध्ये अनेक जणांना चेहऱ्यावरील पिंपल्सची मोठी समस्या असते. अनेक आैषधे घरगुती उपाय देखील करून त्यांच्या चेहऱ्यावरील मुरुम जात नाही. (Try this to get rid of pimples on your face)

रोजच्या कामामुळे चेहऱ्यावर खूप धूळ बसून त्वचा खराब होते. यामुळे तेलकटपणा, रफनेस अशा अनेक समस्या येतात. यामुळे हळूहळू पिंपल्सही येतात. पण यावर बेकिंग सोडा उत्तम पर्याय आहे. बेकिंग सोडा आणि पाण्याला एक करून तुम्ही याची पेस्ट चेहऱ्याला लावू शकता. बेकिंग सोडा चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करेल आणि नवीन थर तयार केले. दिवसातून दोन किंवा तीन वेळा ही पेस्ट 3-4 मिनिटांसाठी तुम्ही लावू शकता. पण ही पेस्ट लावण्याआधी चेहरा स्वच्छ धूवून घ्या.

केळी अगोदर चांगली मॅश करा नंतर दोन चमचे दही आणि एक चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हे सतत केले तर आपल्या चेहऱ्यावरील मुरुम नाहीसे होतील.

कच्चा मध हा मुरुमासाठी एक नैसर्गिक पर्याय आहे. यामध्ये बॅक्टेरिया नष्ट आणि प्रतिबंधित करण्याचे गुणधर्म आहेत. मुरुमावर रात्रभर थोडा शुद्ध मध लावा. तसेच तो पाण्यात मिसळून आपण क्लीन्झर म्हणून देखील वापर करू शकता.

ग्रीन टीमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे मुरुमांचा दाह कमी होतो. ग्रीन टी त्वचेसाठी खूप चांगली आहे. ग्रीन टीच्या पिशव्या पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. या चहाच्या पिशव्या थंड झाल्यावर मुरुमांवर लावा.

मध आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीइन्फ्लेमेटरी असते. ज्यामुळे मुरुम कमी होण्यास मदत होते. मुरुमावर एक-दोन थेंब मध लावा आणि रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Try this to get rid of pimples on your face)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.