AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही, सदैव यशस्वी व्हाल; जपानी कल्चरचे हे 5 मंत्र ठेवा ध्यानी

जपानी संस्कृती जगभरात तिची शिस्त आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. या लेखात, इकीगाई, शिकिता गाई नाई, वाबी साबी, गमन आणि ओउबैटोरी या पाच जपानी तत्वांचा अभ्यास करून आपण आपल्या जीवनात त्यांचे महत्त्व कसे समाविष्ट करू शकतो याची चर्चा केली आहे. ही तत्वे जीवनाचे व्यवस्थापन, धैर्य आणि स्वीकृती यासारख्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकतात.

आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही, सदैव यशस्वी व्हाल; जपानी कल्चरचे हे 5 मंत्र ठेवा ध्यानी
| Edited By: | Updated on: Dec 23, 2024 | 4:10 PM
Share

जपानी लोक अत्यंत शिस्तप्रिय असतात. अत्यंत स्वच्छता पाळणारे असतात. कोणतंही काम वेळेत करण्यावर त्यांचा भर असतो. आळस हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीत नसतो. इतरांचा आदर करणं हे त्यांच्या रक्तातच असतं. नम्रता हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यामुळेच जपानी लोक जगभरात आदर्श लोक म्हणून ओळखले जातात. जपानचं कल्चर आणि परंपरा सुद्धा जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या परंपरा, संस्कार आणि रुढीतून केवळ Crisis Management च नव्हे तर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटीही सुधारण्यास मदत होते.

आज आपण जपानी कल्चरचा विचार करणार आहोत. तुम्ही जपानी कल्चरमधील या गोष्टी जर आत्मसात केल्या तर तुम्हाला तुमचं लाइफ व्यवस्थित मॅनेज करता येईल. जपानी लोकांच्या या कॉन्सेप्ट कोणत्या आहेत? ते काय करतात? याचीच माहिती आपण घेणार आहोत.

Ikigai

जपानी भाषेत Iki चा अर्थ लाइफ असा होतो आणि gai चा अर्थ व्हॅल्यू म्हणजेच मूल्य असा होतो. ढोबळमानाने ईकीगाई म्हणजे जीवनमूल्य असं तुम्ही म्हणू शकता. जपानी लोकांच्या मते याचा अर्थ, तुम्ही जी कोणती गोष्ट कराल ती अत्यंत चांगली करा आणि पॅशनेट होऊन करा. तुम्ही जी गोष्ट करत आहात, तिचा शोध घेण्याच्या पद्धतीसाठी जपानी लोक या शब्दाचा वापर करतात.

Shikita Ga Nai

या शब्दाचा अर्थ म्हणजे परिस्थितीचा स्वीकार करा आणि आयुष्याला पुढे न्या. जीवनात अनेक प्रसंग येतात, अशी परिस्थिती येते की ती आपण बदलू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सामोरे गेलं पाहिजे, असं जपानी लोक म्हणतात.

Wabi Sabi

जीवनातील त्रुटींना स्वीकारा. केवळ आपल्याच नव्हे तर दुसऱ्यांच्या त्रुटीही अत्यंत सहज आणि सुंदरपणे शोधा, असा या प्राचीन जपानी तत्त्वज्ञानाचा अर्थ आहे.

Gaman

Gaman चा अर्थ कठिण प्रसंगात तुमचं धैर्य खचू देऊ नका. वाईट काळ आपल्याला सेल्फ कंट्रोल आणि इमोशनली मॅच्युअर्ड होण्यास शिकवतो. त्यामुळेच सहनशक्ती आणि धैर्य ठेवलं पाहिजे.

Oubaitori

कुणाशीही स्वत:ची तुलना करू नका, असा या जपानी म्हणीचा अर्थ आहे. सर्वांचे मार्ग वेगळे असतात. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्यामुळे एखादा व्यक्ती वेगळ्या मार्गाने जात असेल तर आपण आपल्याला कमी समजू नये, आपल्यावरच आपण प्रश्न उपस्थित करू नये. तो ज्या मार्गाने चाललाय त्यामागे त्याचं ध्येय वेगळं असू शकतं. त्यामुळे तुम्ही त्या मार्गाने गेलंच पाहिजे असं नाही. कारण तुमच्या आणि त्याच्या ध्येयात फरक असणारच.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.