घरी नैसर्गिकरित्या केस काळे करायचे आहे? तर घरात असलेल्या ‘या’ गोष्टींचा करा वापर
आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे केस पांढरे होण्याची समस्या दिसून येत आहे. अशावेळेस काही लोक केस काळे करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर डाईचा वापर करतात, पण यामध्ये असलेले कॅमिकल केसांना नुकसान पोहोचवू शकते. म्हणूनच, आम्ही तुमच्यासाठी एक नैसर्गिक पद्धत घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे केस काळे करू शकता आणि तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय. चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल...

वाढते वय, ताणतणाव, प्रदूषण आणि कॅमिकल प्रोडक्टमुळे अनेकांचे केस हे अकाली पांढरे होत आहे आणि ही एक सामान्य समस्या बनली आहे. त्यामुळे बहुतेक लोकं बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर डाईचा किंवा केस काळे करण्यासाठी रंगांचा वापर करतात . पण तुम्हाला माहिती आहे का की या केसांच्या रंगांमध्ये असलेले अमोनिया, हायड्रोजन पेरोक्साइड इत्यादी कॅमिकलचा केसांना दीर्घकाळात नुकसान पोहोचवू शकतात. हे केवळ केसांची मुळे कमकुवत करत नाहीत तर केस कोरडे, निर्जीव बनवू शकतात आणि अकाली केस गळण्यास कारणीभूत ठरू शकतात.
जर तुम्हालाही तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे करायचे असतील तर यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणजे कॉफी. हो, तुम्ही दररोज सकाळी जी कॉफी पिता तीच कॉफी तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यास मदत करू शकते. कॉफीमध्ये नॅचरल डाईंग हे गुणधर्म असतात, जे केसांना कोणतेही नुकसान न होता केस काळे करतात. शिवाय, ते केसांना मऊ आणि चमकदार बनवते. तर मग जाणून घेऊया कॉफीने केस काळे करण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग कोणता आहे.
कॉफीने केस काळे कसे करावे
साहित्य
- 2 टेबलस्पून इन्स्टंट कॉफी पावडर (किंवा कोणतीही डार्क कॉफी)
- 1 कप पाणी
- 1 टेबलस्पून तुमच्या आवडत्या कंडिशनर
- 1 टेबलस्पून केसांचे तेल (नारळ किंवा बदाम तेल)
पेस्ट कशी बनवायची
पाणी गरम करा आणि त्यात कॉफी पावडर टाका. आता हे मिश्रण चांगले मिक्स करा आणि थंड होऊ द्या. आता तुम्हाला हवे असल्यास या मिश्रणात कंडिशनर आणि थोडे केसांचे तेल टाका. हे मिश्रण तुमच्या स्वच्छ आणि कोरड्या केसांना मुळांपासून टोकांपर्यंत पूर्णपणे लावा. केसांना शॉवर कॅपने झाकून सुमारे 1 तास तसेच राहू द्या. एक तासानंतर, साध्या पाण्याने केस धुवा. शॅम्पू करू नका. पहिल्यांदाच थोडा फरक दिसून येईल. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही ते आठवड्यातून 2-3 वेळा लावू शकता.
कॉफी हेअर डायचे फायदे
कॉफी हेअर डायचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, ते नैसर्गिक आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या केसांवर होत नाहीत. हे केसांना गडद रंग देते आणि केस मऊ आणि चमकदार बनवते. एवढेच नाही तर ते स्कॅल्पला पोषण देते आणि मजबूत करते, ज्यामुळे केस गळती देखील थांबते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
