AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेकअप काढायचा असेल तर केमीकल न वापरता या गोष्टींचा करा उपयोग, स्किन होईल टवटवीत

आपण आपल्या चेहऱ्याला हानी पोहोचू नये यासाठी नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या मेकअप रिमूव्हलबाबत जाणून घेणार आहोत. हे नैसर्गिक मेकअप रिमूव्हल आपल्या चेहऱ्याला केमिकलपासून वाचवतो आणि आपला मेकअप सहज रिमूव्ह होतो. तर आता आपण या नैसर्गिक मेकअप रिमूव्हलबाबत जाणून घेणार आहोत.

मेकअप काढायचा असेल तर केमीकल न वापरता या गोष्टींचा करा उपयोग, स्किन होईल टवटवीत
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 01, 2023 | 6:33 PM
Share

Lifestyle :  सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. लग्न म्हटलं की मेकअप आलाच. लग्नसमारंभात स्त्रिया आवर्जून मेकअप करत असतात. पण थोड्यावेळासाठी केलेला हा मेकअप स्त्रियांच्या चेहऱ्यासाठी हानिकार ठरू शकतो. त्यात महिला लग्नसमारंभामध्ये आपल्या चेहऱ्यावरी डाग, डार्क सर्कल्स लपवण्यासाठी कन्सीलर, फाऊंडेशनचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यात बहुतेक महिला स्वस्त मेकअप उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. पण हेच स्वस्त असलेले आणि बनावट प्रोडक्ट्स आपल्या चेहऱ्याला हानी पोहचवण्याचं काम करतात.

आजकाल मेकअप प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो. हे केमिकलयुक्त प्रोडक्टस आपल्या स्किनला हानी पोहचवण्याचं काम करतात. मग आपल्या चेहऱ्यावर, डाग, पिंपल्स अशा समस्या निर्माण होताना दिसतात. त्यात आपण मेकअप लावणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच मेकअप काढणं देखील महत्त्वाचं असतं. बहुतेक महिला मेकअप नीट काढत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर तो तसाच राहून जातो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स सारख्या समस्या निर्माण होतात. तर काही महीला कमिकलयुक्त मेकअप रिमूव्हलने मेकअप रिमूव्ह करत असतात.

नारळ तेल – नारळाच्या तेलापासून तुम्ही मेकअप रिमूव्हल बनवू शकता. यासाठी नारळाचं तेल घ्या आणि त्यामध्ये गव्हाचा कोंडा, लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब मिक्स करा. नंतर हे तयार झालेले मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. काही मिनिटांनंतर तुमचा चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमचा मेकअप रिमूव्ह होईल.

ओट्स आणि दही – दही आणि ओट्सपासून तुम्ही रिमूव्हल बनवू शकता. यासाठी दही घ्या आणि त्यामध्ये बदाम पावडर, ओट्स मिक्स करा. तयार झालेली पेस्ट तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि नीट मसाज करा. त्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमचा मेकअप सहज रिमूव्ह होईल.

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.