Valentine’s Day Gift | गिफ्टही द्यायचंय आणि पैसेही वाचवायचेत? मग, ‘या’ आयडिया नक्की वापरा!

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी आपल्या जोडीदारास त्यांना आवडेल अशी कोणती भेटवस्तू द्यावी आणि ती आपल्या बजेटमध्ये असेल का? या विचाराने सगळ्यांचीच डोकी भंडावलेली असतात.

Valentine’s Day Gift | गिफ्टही द्यायचंय आणि पैसेही वाचवायचेत? मग, ‘या’ आयडिया नक्की वापरा!
गिफ्टही द्यायचंय आणि पैसेही वाचवायचेत?

मुंबई :व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी आपल्या जोडीदारास त्यांना आवडेल अशी कोणती भेटवस्तू द्यावी आणि ती आपल्या बजेटमध्ये असेल का? या विचाराने सगळ्यांचीच डोकी भंडावलेली असतात. आपल्याला देखील असेच काही प्रश्न पडले असतील तर, आम्ही आपल्याला या चिंतेतून मुक्त करणार आहोत. तुम्हाला अशा भेटवस्तूंबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या जोडीदारासाठी खास ठरतील आणि तुमच्या बजेटमध्ये देखील मावतील (Valentines day romantic and pocket friendly gift ideas).

फुलांचा पुष्पगुच्छ

फुलांचा पुष्पगुच्छ देखील 200 ते हजार रुपयांच्या बजेटमध्ये येतो. परंतु, आपण संपूर्ण पुष्पगुच्छ देऊ इच्छित नसल्यास, फक्त एक गुलाबपुष्प देऊन आपले प्रेम व्यक्त करू शकता. त्यातही खास गोष्ट अशी आहे की, पुष्पगुच्छ हाताळताना अनेक समस्या येतात, तर आपण एखादे फुल पुस्तक किंवा डायरीच्या मध्यभागी ठेवून, जपून ठेवू शकता.

ग्रीटिंग कार्ड

आजकाल अशी अनेक ग्रीटिंग कार्ड्स येतात, ज्यात आधीच रोमँटिक मेसेज लिहिलेले असतात. आपण स्वतः एक देखील एखादे कार्ड बनवू शकता. यातली खास गोष्ट म्हणजे आपण आपल्या मनातील भावना आपल्या शब्दांत लिहू शकता. या व्यतिरिक्त आपण या कार्डमध्ये दोघांचे फोटो देखील लावू शकता.

संगीत

रोमँटिक गाणी किंवा आपले कोणतेही संदेश सीडी किंवा पेन ड्राईव्हमध्ये रेकॉर्ड करा आणि आपल्या जोडीदारास भेट म्हणून द्या. जेव्हा जेव्हा तो किंवा ती एकटे असतील किंवा त्यांना आपली आठवण येईल, तेव्हा ते ती गाणी किंवा आपला संदेश ऐकू शकतील.

पेंडेंट

आपण त्यांना एखादे सुंदर पेंडेंट भेट देखील देऊ शकता. या खास प्रसंगी भेट देण्यासाठी हार्ट-आकाराचे पेंडेंट चांगले आहेत. याशिवाय, मुलींना कानातले देखील आवडतात, म्हणून आपण त्यांना सुंदर कानातले देखील देऊ शकता आणि या भेटवस्तू आपल्या बजेटमध्ये देखील असतील.

उशी

आजकाल अनेक नाविन्यपूर्ण भेटवस्तू बाजारात येत आहेत. आपण उशीवर आपल्या जोडीदाराचा फोटो छापू शकता किंवा आपण त्यावर त्यांच्यासाठी एक सुंदर संदेश देखील लिहू शकता. ही भेट सर्वात गोड आणि स्वस्त देखील आहे (Valentines day romantic and pocket friendly gift ideas).

लाईट फोटो लॅम्प

फोटो आणि लाईटने डेकोरेटेड दिवे देखील सध्या खूप लोकप्रिय आहेत. आपण हे लॅम्प ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि त्यांनाही या नक्कीच आवडतील. शिवाय याची किंमत देखील जास्त नाही.

वॉलेट

वॉलेट ही एक भेट आहे जी पुरुष आणि महिला जोडीरांसाठी योग्य आहे. हे स्वस्त देखील आहेत आणि त्याच वेळी ही एक भेट आहे जी आपल्या जोडीदाराबरोबर नेहमीच असते, कारण आपण नेहमीच पाकीट आपल्यासोबत ठेवू शकता.

चॉकलेट्स

प्रेमात आणि नात्यात गोडपणा असणे खूप गरजेचे आहे, म्हणून या खास दिवशी आपण आपल्या जोडीदारास चॉकलेट देखील देऊ शकता. आजकाल बाजारात चॉकलेटचे पुष्पगुच्छ देखील मिळतात, ज्यात चॉकलेटची फुले सजवलेली असतात. त्याची किंमत 500 रुपयांपासून सुरू होते.

(Valentines day romantic and pocket friendly gift ideas)

हेही वाचा :

Published On - 10:41 am, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI