Gifting Ideas | राशीनुसार जोडीदाराला देऊ शकता ‘Valentine Gift’,  वाचा कोणत्या राशीला काय द्याल?

‘व्हॅलेंटाईन डे’साठी आता फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. आणि अशा परिस्थितीत अनेक लोकांना त्यांच्या जोडीदारासाठी कोणती भेट घ्यावी, या प्रश्नांनी वेढलेले आहेत.

Gifting Ideas | राशीनुसार जोडीदाराला देऊ शकता ‘Valentine Gift’,  वाचा कोणत्या राशीला काय द्याल?
व्हॅलेंटाईन डे

मुंबई :व्हॅलेंटाईन डे’साठी आता फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. आणि अशा परिस्थितीत अनेक लोकांना त्यांच्या जोडीदारासाठी कोणती भेट घ्यावी, या प्रश्नांनी वेढलेले आहेत. परंतु, जर आपल्यास आपल्या जोडीदाराची रास माहित असेल, तर यानुसारच आपण सर्वात चांगली भेट वस्तू निवडू शकाल. चला तर, जाणून घेऊया कोणत्या राशीला काय भेट द्यावी…( Valentines day gifting ideas for partner according to zodiac sign)

मेष

मेष रास असलेले लोक खूप धैर्यवान आणि ध्येयवादी आहेत. तर आपण त्यांच्यासाठी अॅक्टिव्हिटीने भरलेल्या दिवसाची योजना बनवू शकता. त्यांच्यासाठी यापेक्षा चांगली भेट दुसरी असूच शकत नाही. तेव्हा अशा लोकांना भेट देण्यासाठी, रोड ट्रिप किंवा एखाद्या थीम पार्कमध्ये जाण्याची योजना आखा.

वृषभ

या राशीच्या लोकांना बर्‍यापैकी विलासी आणि सुंदर गोष्टी आवडतात. म्हणून त्यांच्यासाठी आपण ड्रेस, परफ्युम आणि दागदागिने आणि चविष्ट अन्नाची निवड करू शकता.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना जीवनात मजा आणि उत्साह हवा असतो. म्हणून या व्हॅलेंटाईन डेला, आपण त्यांच्यासाठी सहलीची योजना आखू शकता. या लोकांना वाचायला देखील आवडते. म्हणूनच, आपण त्यांच्यासाठी भेट म्हणून एखादे पुस्तक देखील देऊ शकता.

कर्क

कर्क राशीचे लोक खूप भावनिक आणि संवेदनशील असतात. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी काहीतरी खास, जे त्यांच्या मनाला भावेल, असे गिफ्ट द्यावे. यासाठी आपण अविस्मरणीय फोटोंनी सुशोभित केलेला एखादा फोटो अल्बम घेऊ शकता. किंवा कँडल लाईट डिनरची योजना करू शकता.

सिंह

सिंह राशीचे लोक सोशल मीडिया प्रेमी असतात. त्यांच्यासाठी आपण लाईटबॉक्स किंवा दागिने घेऊ शकता, जे ते  इन्स्टाग्रामवर देखील फ्लाँट देखील करू शकतील.

कन्या

कन्या राशीच्या लोकांना लहान-साहान गोष्टीं आवडतात. ज्यासाठी आपण त्यांना छोटी रोपटी, पाळीव प्राणी किंवा पक्षी आणि आरोग्याशी संबंधित एखादे पुस्तक किंवा दागिने भेट देऊ शकता (Valentines day gifting ideas for partner according to zodiac sign).

तूळ

तूळ राशीच्या लोकांना सुंदर दिसणार्‍या गोष्टी आवडतात. म्हणून आपण त्यांना एखादी पारंपारिक भेट देऊ शकता, ज्यामध्ये आपण चॉकलेट्स, डिनर आणि मूव्ही डेटला नेऊ शकता.

वृश्चिक

सर्व राशींमध्ये वृश्चिक राशीचे लोक बरेचसे एकट्यात राहणारे असतात. काही लोक छुपे रुस्तम टाईप असतात. म्हणून, या लोकांसाठी भेटवस्तू खरेदी करणे फार कठीण आहे. म्हणून आपण त्यांच्या एखादे खास वस्त्र भेट देऊ शकता.

धनु

धनू खूप मजेदार आणि आनंदी स्वभावाचे लोक आहेत. तर, या लोकांसाठी आपण आऊटडोर अॅक्टिव्हिटीची योजना करू शकता. बर्फ स्केटिंग आणि कायाकिंगचा प्लॅन करू शकता.

मकर

या राशीच्या लोकांना व्यावहारिक आणि कामाशी संबंधित गोष्टी करण्यास आवडतात. यासाठी आपण त्यांना रेशीम शर्ट, व्यवसायिक सूट आणि चामड्याच्या वस्तू देऊ शकता.

कुंभ

या राशीच्या लोकांसाठी गॅझेट्स, व्हिडिओ गेम, फ्लोरल टाईप शर्ट, कोट्स असलेल्या काही सजावटीच्या वस्तू देऊ शकता.

मीन

ही शेवटची रास आहे, त्यांच्याकडे 12 राशीची बुद्धिमत्ता आहे. त्यांना झोपेची आवड आहे. 14 फेब्रुवारी रोजी, आपण यांना एखादा छानसा फेस मास्क, सुगंधित मेणबत्त्या आणि सुगंधित तेल देऊ शकता.

(Valentines day gifting ideas for partner according to zodiac sign)

हेही वाचा :

Published On - 5:22 pm, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI