Vijaya Ekadashi 2021 | ध्येय साध्य करण्यासाठी ‘विजया एकादशी’ महत्त्वाची, जाणून घ्या एकदशीबद्दल…

शास्त्रात एकादशीचे व्रत फार महत्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, हे व्रत माणसाच्या पापांचे निराकरण करते आणि त्याचे जीवनात मोक्ष मिळवून देते. एकादशी व्रत दर महिन्याला दोनदा ठेवले जाते.

Vijaya Ekadashi 2021 | ध्येय साध्य करण्यासाठी ‘विजया एकादशी’ महत्त्वाची, जाणून घ्या एकदशीबद्दल...
विजया एकादशी
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 11:35 AM

मुंबई : शास्त्रात एकादशीचे व्रत फार महत्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, हे व्रत माणसाच्या पापांचे निराकरण करते आणि त्याचे जीवनात मोक्ष मिळवून देते. एकादशी व्रत दर महिन्याला दोनदा ठेवले जाते. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. आज अर्थात 9 जानेवारी रोजी ‘विजया एकादशी’ आहे (Vijaya Ekadashi 2021 Know the importance of Vijaya Ekadashi and muhurat).

शास्त्रात या एकादशीचे महत्त्व सांगताना म्हटलेय की, विजया एकादशीचे व्रत ठेवल्यास एखाद्याला पूर्वीच्या आणि या जन्माच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. तुमच्या आयुष्यात अशाच काही समस्या असल्यास आणि बर्‍याच प्रयत्नांनंतरही तुमचे काम बिघडत असेल, तर तुम्ही विजया एकादशीच्या व्रतासोबत काही उपाय देखील केले पाहिजेत. चला तर, या व्रतासंबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊया…

विशिष्ट कामात यश मिळवण्यासाठी

सकाळी स्नानानंतर सूर्याला गंगेचे पाणी अर्पण करा. यानंतर श्री राम परिवाराची पूजा करा. अकरा-अकरा केळी, लाडू, लाल फुले अर्पण करा. अकरा चंदन अगरबत्ती, धूप आणि दिवे प्रज्वलित करा. अकरा खजूर आणि बदाम अर्पण करा. यानंतर ‘ॐ सिया पतिये राम रामाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

चांगल्या नोकरीसाठी

जर, आपण बर्‍याच दिवसांपासून नोकरी शोधत असाल, परंतु आपल्याला चांगली नोकरी मिळत नसेल, तर उद्याच्या दिवशी यावर उपाय करू शकता. यासाठी एक कलश घ्या. या कलशांवर आंब्याची पाने ठेवा. हा कलश जावाने भरा आणि त्यावर दिवा लावा. 11 लाल फुले, 11 फळे आणि मिठाई अर्पण करा. यानंतर सूर्याचे कारक भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मी जी यांची पूजा करा. तसेच ‘ॐ नारायण लक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा जप करावा.

अशा प्रकारे करा व्रत

कोणत्याही एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या रात्रीपासून सुरू होतात. दशमीच्या संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी सात्विक भोजन घेतल्यानंतर ब्रह्मचर्य पाळा आणि द्वादशीच्या दिवसापर्यंत तसेच पाळा. एकादशीच्या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान वगैरे करुन, परमेश्वरासमोर उपवास करण्याचा संकल्प करा. दिवसभर उपवास करा, देवाची योग्य प्रकारे उपासना करा. व्रताची कथा वाचा किंवा ऐका आणि आरती म्हणा. शक्य असल्यास एकादशीच्या रात्री जागे रहा आणि परमेश्वराची स्तुती करा. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी सूर्योदयानंतर व्रत पूर्ण करावे लागते. ही व्रत निर्जळी झाल्यास ते सर्वोत्तम मानले जाते. मात्र, क्षमता नसल्यास आपण पाणी प्यावे किंवा फळे किंवा इतर सात्विक गोष्टी सेवन करू शकता आणि उपवास ठेवू शकता. आपण वर्षभर प्रत्येक एकादशी व्रत ठेवल्यास प्रत्येकाने समान नियम पाळले पाहिजेत (Vijaya Ekadashi 2021 Know the importance of Vijaya Ekadashi and muhurat).

शुभ मुहूर्त :

विजया एकादशी : दिवस मंगळवार 9 मार्च 2021

एकादशी तिथी प्रारंभ : दिवस सोमवार 08 मार्च 2021, दुपारी 03:44 वाजता

एकादशीची समाप्ती तिथी : दिवस मंगळवार 09 मार्च 2021, रोजी दुपारी 03:02 वाजता

पारणा मुहूर्ता : दिवस बुधवार 10 मार्च सकाळी 06:37 पासून 08:59 वाजेपर्यंत

व्रताची कथा

द्वापरयुगात धर्मराज युधिष्ठिराला फाल्गुन एकादशीचे महत्त्व जाणून घेण्याची उत्सुकता होती. भगवान कृष्णाकडे आपली इच्छा त्याने प्रकट केली. मग, भगवान श्रीकृष्णाने त्याला फाल्गुन एकादशीचे महत्त्व व कथा सांगितली आणि सांगितले की ही गोष्ट त्रेतायुगची आहे.

जेव्हा, सीतेच्या हरणानंतर भगवान श्रीरामांनी सुग्रीवाची सेना रावणाशी लढायला नेली आणि लंकेच्या दिशेने गेले तेव्हा विशाल समुद्राने लंकेच्या पुढे मार्ग अडवला. समुद्रामध्ये खूप धोकादायक समुद्री प्राणी होते, ज्यामुळे मर्कट सैन्यास हानी पोहोचू शकते. श्री राम मानवी स्वरुपाचे होते, त्याचप्रकारे त्यांना ही समस्या सोडवायची होती.

जेव्हा, त्यांना लक्ष्मणकडून समुद्र पार करण्याचा मार्ग जाणून घ्यायचा होता, तेव्हा लक्ष्मण म्हणाले की, तुम्ही सर्वज्ञानी आहात. प्रभु, तुम्हाला जर हे जाणून घ्यायचे असेल, तर मला वाटते की येथून काही अंतरावर वकदलभ्य मुनिचे वास्तव्य आहे, त्यांच्याकडे यावर नक्कीच काही उपाय असतील.

त्यावेळी भगवान श्री राम त्यांच्याकडे पोहोचले. त्यांच्यासमोर मांडली. मग, ऋषींनी त्यांना सांगितले की, जर आपण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला तुमच्या सेनेसह व्रत ठेवले, तर सर्व सैन्यासह आपण समुद्र पार करू शकाल.तसेच, यामुळे आपल्याला लंकेवर विजय मिळेल. ऋषीच्या सांगण्यानुसार भगवान राम आणि त्यांच्या सेनेने हे व्रत केले आणि त्याचे इच्छित फळ त्यांना मिळाले.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही.)

(Vijaya Ekadashi 2021 Know the importance of Vijaya Ekadashi and muhurat)

हेही वाचा :

बुद्धांची ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल, वाचा Motivational Story

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.