तुमचाही नको तो व्हिडीओ होऊ शकतो व्हायरल… हॉटेलात जाताना या गोष्टींची घ्या खबरदारी
जयपूरच्या पंचतारांकित हॉटेलमधील जोडप्याचा खाजगी व्हिडीओ व्हायरल झाल्याने हॉटेलमध्ये सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हॉटेल निवडताना कपल्सने काळजीपूर्वक ऑनलाइन रिव्ह्यू आणि पॉलिसी तपासणे, खिडक्या आणि दरवाजे तपासणे, आणि छुपे कॅमेरे शोधणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसराची जाणीव ठेवून आणि सतर्क राहून आपण अशा घटना टाळू शकतो.

जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील जोडप्याचा इंटिमेट सीनचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हॉटेलच्या रुममधील खिडकी उघडीच ठेवल्याने हा गोंधळ झाला. एवढच नाही तर आतलं दृश्य पाहण्यासाठी जयपूरच्या या हॉटेलच्या बाहेर लोकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं. यामुळे कपल्सच्या विचित्र वागण्यावर आणि लोकांच्या विकृत मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत. सध्याचं युग डीजिटल युग आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना किंवा एखाद्या अनोळखी जागेत जाताना लोकांनी काही काळजी घेणं आवश्यक आहे. एखाद्या हॉटेलात पार्टनरसोबत जाताना तर कपल्सने काळजी घेतलीच पाहिजे. काय काळजी घेतली पाहिजे? हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेल निवडताना ते कपल फ्रेंडली आणि चांगलं हॉटेल निवडावं. अशा हॉटेलात प्रायव्हसी, सुरक्षा आणि गेस्टच्या सन्मानाची काळजी घेतली जाते. हॉटेल बुक करताना ऑनलाईन रिव्ह्यू पाहा, स्टार रेटिंग आणि हॉटेलची पॉलिसी वाचा. त्यानंतर हॉटेलच्या रुममध्ये दाखल होताच सर्वात आधी खिडक्या आणि दरवाजांवर नजर टाका. खिडक्यांना पडदे नसतील तर आतलं दृश्य बाहेरच्या लोकांना दिसतं. पडदे नसतील तर हॉटेलची रुम बदलून घ्या. रुममधील लाईट सुरू करताना बाहेरून कोणी रुममध्ये डोकावून तर पाहत नाही ना याची काळजी घ्या.
रुममध्ये चेक इन केल्यावर…
रुममध्ये चेक इन केल्यावर रुममध्ये एखादा छुपा कॅमेरा किंवा रेकॉर्डिंग डिव्हाईस तर नाही ना? याची खात्री करून घ्या. आरसा, भिंत, घड्याळ, चार्जर पोर्ट, धुराचे सेन्सर याकडे लक्ष द्या. मोबाईल कॅमेऱ्याची फ्लॅश वा टॉर्चने खोलीचं निरीक्षण करा. थोडाही संशय आला तर हॉटेलच्या मॅनेजरला सांगा. आजच्या काळात कुणाचाही व्हिडीओ रेकॉर्ड करणं आणि तो व्हायरल करणं हा सायबर गुन्हा आहे. हॉटेलच्या आसपास आणि परिसरात संदिग्ध व्यक्ती मोबाईलमधून रेकॉर्डिंग करताना दिसल्यास सतर्क व्हा. कोणत्याही अनधिकृत रेकॉर्डिंगची तक्रार हॉटेल प्रशासनाकडे करा.
एक चूक महागात पडू शकते
एवढं केल्यानंतर पर्सनल मोमेंट्सबाबत कपल्सने जागरूक असणं आवश्यक आहे. रोमांटिक क्षण घालवताना सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे. दरवाजा, खिडक्या, पडदे नीट लावलेले आहेत की नाही हे चेक केलं पाहिजे. आपल्या आजूबाजूचा परिसर कोणता आहे? हॉटेलच्या खाली लोकांची वर्दळ आहे का? या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. केवळ हॉटेल बुक केलं म्हणजे सर्व काही संपलं असं होत नाही. बाहेरच्या ठिकाणी राहताना कुणाच्याही भरवश्यावर राहणं योग्य नाही. आपल्या सुरक्षेची काळजी आपणच घेतली पाहिजे. तसेच सतत सतर्क राहिलं पाहिजे. नाही तर जराशी चूकही महागात पडू शकते.