AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय आहेत डाउन सिंड्रोमची लक्षणे? प्रेग्नंसीमध्ये या आजाराचे निदान होते का?

डाउन सिंड्रोम ही एक अनुवांशिक अवस्था आहे. पण प्रेग्नंसीमध्ये या आजाराचे निदान होते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.. चला जाणून घेऊया त्याविषयी..

काय आहेत डाउन सिंड्रोमची लक्षणे? प्रेग्नंसीमध्ये या आजाराचे निदान होते का?
Down SyndromeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 19, 2025 | 2:12 PM
Share

काही वर्षांपूर्वी, म्हणजे 2007 मध्ये, एक चित्रपट आला होता, ज्याचं नाव होतं ‘तारे जमीन पर’. यामध्ये आमिर खानने एका अशा मुलाची कहाणी दाखवली होती, जो अभ्यासात कमकुवत होता, पण त्याच्या कल्पनांची उंची अनंत होती. त्या चित्रपटाने आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येक मूल खास असतं. आता 20 जून रोजी पुन्हा एक खास चित्रपट येत आहे. या चित्रपटात दाखवलेली अनेक मुलं डाउन सिंड्रोमने ग्रस्त आहेत. तरीही, हा कोणता आजार नाही, तर ही एक जैविक अवस्था आहे, जी समजून घेणं आणि स्वीकारणं आपल्या समाजासाठी अत्यंत गरजेचं आहे.

डाउन सिंड्रोम म्हणजे काय?

डाउन सिंड्रोम ही एक अनुवांशिक अवस्था आहे, जी 21 व्या क्रोमोसोमची अतिरिक्त प्रत शरीरात असल्याने उद्भवते. म्हणजेच, सामान्य माणसाच्या शरीरात 46 क्रोमोसोम असतात, तर डाउन सिंड्रोम असलेल्या व्यक्तीच्या शरीरात 47 क्रोमोसोम असतात. हा अतिरिक्त क्रोमोसोम त्यांच्या विकास, शिकण्याची क्षमता आणि शारीरिक रचनेवर परिणाम करतो. हा कोणता संसर्गजन्य आजार नाही आणि तो इतर कोणाकडून होत नाही. हा जन्मतःच असतो आणि आयुष्यभर तसाच राहतो.

डाउन सिंड्रोमची लक्षणं कशी असतात?

प्रत्येक व्यक्तीमध्ये याची लक्षणं थोडी वेगळी असू शकतात, पण काही सामान्य संकेतांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • चेहरा गोल आणि सपाट दिसणे
  • डोळ्यांची रचना किंचित वरच्या दिशेने असणे
  • जीभ अनेकदा बाहेर निघाल्यासारखी दिसणे
  • स्नायूंमध्ये कमजोरी
  • विकासाची गती सामान्यपेक्षा संथ असणे
  • शिकण्यात अडचण
  • बोलण्यात आणि समजण्यात उशीर

याचा अर्थ असा नाही की डाउन सिंड्रोम असलेली माणसं काहीच करू शकत नाहीत. योग्य काळजी, प्रेम आणि प्रोत्साहनाने ही मुलंही शिकू शकतात. कला, संगीत आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाऊ शकतात.

गर्भधारणेदरम्यान डाउन सिंड्रोमचा शोध घेता येऊ शकतो का?

डॉ. राकेश यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान जर एखादी स्त्री खालील चाचण्या करून घेत असेल, तर बऱ्याच प्रमाणात या अवस्थेची ओळख पटवता येते:

  • पेरेंटल स्क्रीनिंग टेस्ट
  • नॉन-इनव्हेसिव्ह पेरेंटल टेस्टिंग (NIPT)
  • Chorionic Villus Sampling (CVS)

डाउन सिंड्रोमवर उपचार शक्य आहे का?

ही एक आयुष्यभर राहणारी अवस्था आहे, जी पूर्णपणे बरी होऊ शकत नाही. पण योग्य उपचार, थेरपी आणि वर्तणुकीच्या आधाराने या मुलांना सामान्य जीवन जगण्यास मदत मिळू शकते.

  • स्पीच थेरपी: बोलण्यात आणि समजण्यात मदत करते
  • फिजिओथेरपी: स्नायूंना बळकटी देण्यासाठी
  • विशेष शिक्षण: शिकण्याच्या वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून शिक्षण
  • पालकांचा आधार आणि समाजाची भूमिका: सर्वात महत्त्वाची असते
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.