AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Relationship Survey : रिलेनशीप,लग्नाविषयी भारतीय स्त्रियांचे विचार काय? निष्कर्ष असे की, तुम्हाला ही बसेल धक्का

Relationship Survey : लग्न आणि रिलेशनशीपविषयी भारतीय स्त्रियांचे विचार काय? निष्कर्ष ऐकून बसेल धक्का

Relationship Survey : रिलेनशीप,लग्नाविषयी भारतीय स्त्रियांचे विचार काय? निष्कर्ष असे की, तुम्हाला ही बसेल धक्का
| Updated on: Jan 21, 2023 | 8:41 PM
Share

नवी दिल्ली : लग्न आणि रिलेशनशीप (Marriage And Relationship) सारख्या प्रकरणात प्रत्येक व्यक्ती फार गांभीर्याने विचार करतो. त्यानंतरच तो योग्य ते पाऊल टाकतो. भारतीय समाजात (Indian Society) लग्न हा संस्कार आणि पवित्र बंधन मानण्यात येते. परंतु, आता काळानुसार त्यात बदल दिसून येत आहे. आता अनेक तरुण-तरुणी लग्नापूर्वी भेटीगाठी घेतात. एकमेकांना वेळ देतात. समजून घेतात आणि नंतर पुढचा निर्णय घेतात. तर काही ठिकाणी अजूनही लग्नापूर्वी तरुण-तरुणीच्या भेटीला योग्य मानण्यात येत नाही. भारतीय परंपरेत या गोष्टींकडे पाहण्याचा कर्मठ दृष्टिकोन आहे.

लग्न आणि रिलेशनशीपविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. काही परंपरा आणि कर्मठ विचार आहेत. लग्न आणि रिलेशनशीपविषयी एक सर्व्हेक्षण करण्यात आले. सर्व्हेक्षणातील आकडेवारीवर नजर टाकली असता, त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते.

या डिजिटल युगात जीवनसाथी निवडीसाठीही आता डिजिटल माध्यमांचाच वापर होत आहे. अनेकजण लग्नाविषयीचे अॅप्स, साईटचा अथवा सोशल डेटिंग साईटचा आधार घेत आहेत. यामधील एक डेटिंग अॅप बंबलने हा सर्वे पूर्ण केला. बंबलच्या आकडेवारीने अनेकांना धक्का बसला.

डेटिंग अॅपचा वापर करणाऱ्या जवळपास 39 टक्के लोकांना वाटते की, त्यांचे कुटुंबिय लग्न सराईत त्यांना लग्न करण्याची वा एखाद्या रिलेशनशीपमध्ये अडकण्याचा सल्ला देतात. या अॅपचा वापर करणाऱ्या जवळपास 33% अविवाहित तरुण-तरुणींना वाटते की, त्यांना लग्नासाठी बळीचा बकरा बनविल्या जात आहे. त्यांच्यावर दबाव आहे.

डेटिंग अॅप बंबलच्या आकडेवारीनुसार, भारतातील जवळपास 81 टक्के महिला लग्न न करताच खूश आहेत. त्यांना एकटे राहण्यात जास्त चांगले वाटते. या सर्वेत जवळपास 83 टक्के महिलांनी भावना व्यक्त केली की, त्यांना जोपर्यंत योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत त्या कोणत्याही नात्यात अडकू इच्छित नाही.

Follow Us
बीडीडी चाळीतील 864 घरांचे वितरण, फडणविसांच्या हस्ते दिल्या चाव्या!
बीडीडी चाळीतील 864 घरांचे वितरण, फडणविसांच्या हस्ते दिल्या चाव्या!.
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.