AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाच्या इंजिनमध्ये का टाकली जाते जिवंत कोंबडी? कारण जाणून धक्का बसेल

पक्ष्यांच्या धडकेमुळे विमान अपघात झाल्याचं बऱ्याचदा घडलं आहे. विमानांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विमान उड्डाणापूर्वी एक चाचणी केली जाते. ही चाचणी करताना इंजिनमध्ये चक्क जिवंत कोंबडीला टाकले जाते.पण असं का? जाणून घेऊयात.

विमानाच्या इंजिनमध्ये का टाकली जाते जिवंत कोंबडी? कारण जाणून धक्का बसेल
Why is a live chicken thrown into an airplane engineImage Credit source: Meta AI
| Updated on: Jun 15, 2025 | 12:49 PM
Share

नुकताच झालेल्या अहमदाबाद विमान अपघाताने सगळ्यांनाच धक्का बसला. अपघाताचं एक कारण असही म्हटलं जातं की विमानला पक्षी धडकले गेले होते. आणि हे आताच नाही तर अनेकदा आपण हे ऐकलं असेल की अनेकदा पक्षी विमानावर धडकल्यामुळे अपघात झाला. विमान उड्डाण करताना किंवा उतरताना पक्षी धडकू शकतात. अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की, एवढ्या मोठ्या विमानाला एक छोटा पक्षी धडकला तर असं काय नुकसान होऊ शकतं? पण उड्डाण करताना आणि उतरताना विमानाचा वेग ताशी 350 ते 500 किमी असतो. अशा परिस्थितीत, एका लहान पक्ष्यानेही त्याला धडक दिल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानाचा विंडशील्ड तुटू शकतो. असे अनेक वेळा घडले आहे की समोरील विंडशील्ड तुटल्याने पायलट देखील जखमी झाले आहेत.

उड्डाण करण्यापूर्वी इंजिनमध्ये जिवंत कोंबडी टाकली जाते

जर एखादा पक्षी इंजिनमध्ये घुसला किंवा प्लेटला धडकला तर विमान कोसळू शकतं. पक्ष्यांच्या धडकण्यामुळे इंजिन बंद पडू शकतं आणि आग लागू शकते. यामुळे विमान कोसळू शकतं. म्हणूनच जगभरातील बहुतेक विमान कंपन्या उड्डाण करण्यापूर्वी एक काम नक्की करतात. हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. विमान कंपन्या उड्डाण करण्यापूर्वी ‘चिकन गन’ चाचणी करतात. म्हणजेच उड्डाण करण्यापूर्वी इंजिनमध्ये जिवंत कोंबडी टाकली जाते. ही चाचणी का केली जाते जाणून घेऊयात.

चिकन गन टेस्ट म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, ही विमान इंजिन चाचणी आहे. विमानाच्या इंजिनची कार्यक्षमता तपासण्यासाठी जिवंत कोंबडीचा वापर केला जातो. पक्ष्यांच्या टक्करचा परिणाम समजून घेण्यासाठी, इंजिनिअर चिकन गन नावाच्या एका विशेष मशीनचा वापर करतात. ही एक मोठी कॉम्प्रेस्ड एअर गन आहे, जी विमानाच्या विंडशील्ड, पंख आणि इंजिनवर कोंबडीला फायर केलं जातं. कोंबडीचा वेग खऱ्या पक्ष्यांच्या टक्करीच्या वेगाइतकाच असतो.

ही चाचणी लॅबमध्ये केली जाते. विमानाच्या काचा आणि इंजिन चांगल्या स्थितीत आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी लॅबमध्ये चिकन गनची चाचणी केली जाते. प्रयोगशाळेत, इंजिनिअर हाय-स्पीड कॅमेऱ्यांनी संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग करतात. त्यानंतर ते पक्ष्याच्या धडकेमुळे झालेल्या नुकसानाचे विश्लेषण करतात.

चिकन गन टेस्ट किंवा बर्ड स्ट्राइक टेस्ट ही जिवंत कोंबडीद्वारेच केली जाते. कारण कोंबडीचे वजन, आकार आणि टिशू उडणाऱ्या पक्ष्यासारखेच असतात. आजकाल सर्व मोठ्या विमान उत्पादक कंपन्या ही पद्धत अवलंबत आहेत. ही चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या विमानांनाच उड्डाण करण्याची परवानगी आहे.

बर्ड स्ट्राइक टेस्ट कशी असते?

उड्डाणापूर्वी, विमानाचे इंजिन, कॉकपिट विंडशील्ड आणि पंख एका मजबूत फ्रेममध्ये ठेवले जातात. त्यानंतर या सर्व भागांची क्षमता तपासली जाते. विमानाच्या उड्डाण गतीसारखी व्यवस्था लॅबमध्ये केली जाते.

विमानाच्या मुख्य भागांवर कोंबडी टाकल्यावर काय होते

मग इंजिनवर काय टाकायचे ते ठरवले जाते. मेलेली कोंबडी, नकली पक्षी किंवा जिलेटिन बॉल, हे काही पर्याय आहेत. सहसा जिवंत कोंबडी टाकूनच चाचणी केली जाते. जिवंत कोंबडी विमानाच्या उड्डाणाच्या वेगाने फेकली जाते. विमानाच्या मुख्य भागांवर कोंबडी टाकल्यावर काय होते ते रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर व्हिडिओमध्ये प्रत्येक क्षण काळजीपूर्वक पाहिला जातो.

कोंबडा फेकल्याने किती आणि कुठे नुकसान झाले हे देखील तपासले जाते

या व्हिडिओमध्ये कोंबडा फेकल्याने किती आणि कुठे नुकसान झाले हे देखील तपासले जाते. त्यानंतर इंजिनिअर आणि तंत्रज्ञ इंजिनचा ब्लेड तुटला आहे का, विंडशील्डला तडे गेले आहेत का, विमानाच्या पंखाला नुकसान झाले आहे का ते तपासतात. जर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही तर विमान उडू शकते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.