ग्लिसरीन कसे बनवले जाते? चेहऱ्यावर लावण्याचा सर्वोत्तम मार्ग काय?
स्किन केअरसाठी ग्लिसरीनच्या वापराबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल. ग्लिसरीन त्वचेवर अनेक प्रकारे वापरले जाते, कारण याच्या वापराने त्वचा हायड्रेट होते. यांच्या नियमित वापराने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्तता मिळवू शकते. चला आजच्या लेखात ग्लिसरीन कसे बनवले जाते आणि त्यांचे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात...

ऋतू कोणताही असो आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागतेच, प्रत्येक ऋतूनुसार आपण स्किन केअर रूटीन बदलत असतो. अशातच सर्वात जास्त स्किन केअर ही कोरडी त्वचा असलेल्या लोकांना घ्यावी लागते. यासाठी अनेकजण घरगुती उपाय करत असतात. अशातच त्वचेचा कोरडपणा दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा वापर करतात. कारण ग्लिसरीन हे तुमच्या त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. म्हणूनच हेअर केअरच्या प्रोडक्टपासून ते ओठ, चेहरा आणि बॉडी स्किन केअर प्रोडक्ट्स करिता ग्लिसरीनचा वापर केला जातो. कारण यात असलेले घटक तुमची त्वचा मऊ ठेवण्याचे काम करतात. ग्लिसरीन मुरुमांपासून मुक्त होण्यास आणि त्वचेच्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत करते.
ग्लिसरीन हा असा एक घटक आहे ज्याचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. तुम्ही ग्लिसरीनचा वापर टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी आणि काळे डाग कमी करण्यासाठी करू शकता आणि ते एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर देखील आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण ग्लिसरीन कसे बनवले जाते आणि चेहऱ्यावर कोणत्या पद्धतीने यांचा वापर करावा हे जाणून घेऊयात.
ग्लिसरीन म्हणजे काय?
ग्लिसरीन ज्याला ग्लिसरॉल असेही म्हणतात, तर हे ग्लिसरीन कोणत्याही कॅमिकलपासून तयार केले जात नाही, तर ते एक नैसर्गिक कंपाऊड आहे जे वनस्पतींपासून मिळणाऱ्या तेलापासून मिळते. बिअर, वाइन सारख्या आंबवलेल्या पदार्थांमध्ये देखील आढळते. तर ग्लिसरीनचा शोध सर्वात प्रथम ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण गरम करताना सिरपसारखा चिकट द्रव तयार झाला आणि नंतर या फॅटला ग्लिसरीन म्हणून ओळखले जाऊ लागले. 19 व्या शतकात याचा वापर साबण बनवण्यासाठी वापरले जाऊ लागले.
मॉइश्चरायझर म्हणून वापरा
ग्लिसरीनचा वापर कोरड्या त्वचेला नवीन जीवन देते, तर त्वचा मऊ होते. तुम्ही ग्लिसरीन हे मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता. तर तुम्ही ग्लिसरीनचा मॉइश्चरायझर बनवण्यासाठी सर्व प्रथम गुलाबपाणी आणि ग्लिसरीन समान प्रमाणात घ्या, ते चांगले मिसळा आणि हवाबंद डब्यात ठेवा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर, तो कोरडा करा आणि कापसाच्या मदतीने त्याचे काही थेंब चेहऱ्यावर लावा, परंतु डोळ्यांभोवती काळजीपूर्वक याचा वापर करा.
त्वचेवरील डाग कमी करेल ग्लिसरीन
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन देखील वापरू शकता. यासाठी ग्लिसरीनमध्ये लिंबाचा रस टाका आणि थोडेसे कोरफड जेल मिक्स करा. आता हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे ठेवा आणि नंतर ओल्या स्पंजने चेहरा स्वच्छ करा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.
ओठांचे टॅनिंग स्वच्छ होईल
प्रत्येकाला मऊ आणि गुलाबी ओठ हवे असतात, परंतु कधीकधी टॅनिंग आणि पिग्मेंटेशनमुळे ओठ काळे दिसू लागतात. यापासून मुक्त होण्यासाठी गुलाबपाणी, लिंबाचा रस आणि त्यात काही प्रमाणात ग्लिसरीन मिक्स करा. आता तयार मिश्रण नियमितपणे ओठांवर लावा. अशाने ओठांचे टॅनिंग कमी होते.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
