AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेल्सच्या रुममधील घड्याळाबाबतचं हे मोठं सिक्रेट माहितीये का? चेक इन कराल तेव्हा नक्की लक्ष द्या…

जेव्हा आपण कुठल्या हॉटेलमध्ये थांबतो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली आहे का? अनेक हॉटेलच्या रुममध्ये घड्याळ नसतं. यामागील कारण 99 टक्के लोकांमा माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

हॉटेल्सच्या रुममधील घड्याळाबाबतचं हे मोठं सिक्रेट माहितीये का? चेक इन कराल तेव्हा नक्की लक्ष द्या...
Why dont most hotel rooms have clocksImage Credit source: Meta AI
| Updated on: Jun 15, 2025 | 12:00 AM
Share

जेव्हा जेव्हा आपण सुट्टीवर जातो किंवा एखाद्या महत्त्वाच्या सहलीसाठी बाहेर जातो तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे हॉटेल. कारण आपण काहीस दिवस तिथे राहमार असतो. तिथल्या सुविधांचा लाभ घेणार असतो त्यामुळे आपण फार काळजीपूर्वकच हॉटेल बुक करतो. त्यामुळे आपण हॉटेलची स्वच्छता, व्यवस्था आणि सजावटीकडे नक्कीच लक्ष देतो. पण एक गोष्ट अशी आहे जी अनेकदा आपल्या नजरेतून सुटते ती म्हणजे हॉटेलच्या रुममध्ये घड्याळ नसणे. बहुतेक हॉटेल्समध्ये भिंतीवर घड्याळ किंवा टेबलावर अलार्म घड्याळ नसते. हा केवळ योगायोग नाही तर त्यामागे एक विशेष कारण आहे, जे फार कमी लोकांना माहिती आहे.

म्हणूनच घड्याळ खोलीतून काढून टाकले जाते

हॉटेलमध्ये राहण्याचा मुख्य उद्देश असतो सुविधांचा लाभ घेणे , आराम आणि विश्रांती घेणे. जेव्हा तुम्ही घड्याळाकडे पाहता तेव्हा तुमच्या मनात सतत वेळेचा दबाव असतो, घाई असते जसं की कधी उठायचे, कधी निघायचे, प्रवास वैगरे अनेक गोष्टी. हॉटेल मालकांना हा दबाव दूर करायचा असतो. म्हणूनच घड्याळ खोलीतून काढून टाकले जाते, जेणेकरून तुम्हाला मोकळे वाटेल आणि तुम्हाला हवा तोपर्यंत आराम करता येईल.

 घाई करण्याचा दबाव वाटू नये…

घड्याळ नसल्याने जे गेस्ट असतात त्यांना लवकर उठण्याची किंवा नाश्ता करण्याची काळजी करण्याची गरज नाही. ते उठतात आणि त्यांच्या गतीने त्यांचा दिवस सुरू करतात. यामुळे त्यांना असे वाटते की ते कोणत्याही वेळापत्रकाने बांधलेले नाहीत. हॉटेल हा अनुभव प्रोत्साहित करू इच्छिते.

तसेच गेस्ट त्यांचा ट्रिपचा आनंद घेऊ शकतील. रूम्समध्ये घड्याळ ठेवले जात नाही जेणेकरून त्यांना झोप, नाश्ता किंवा इतर कामांसाठी घाई करण्याचा दबाव वाटू नये. हॉटेलमध्ये येणारे गेस्ट जर वारंवार वेळ पाहत राहिले तर ते त्यांच्या सुट्ट्यांचा आरामात आनंद घेऊ शकणार नाही. यामुळेच बहुतेक हॉटेलमध्ये घड्याळ दिसणार नाहीत.

 लवकर चेक आउट करण्याचा विचार…

घड्याळ नसण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे गेस्ट हॉटेलमध्ये जास्त वेळ घालवतात. जेव्हा त्यांच्यासमोर घड्याळ नसते तेव्हा त्यांना कळत नाही की किती वेळ झाली आहे, किंवा किती उशीर झाला आहे. अशा परिस्थितीत ते हॉटेलच्या रेस्टॉरंट, स्पा किंवा बारसारख्या सेवांचा जास्त उपभोग घेऊ शकतात, ज्यामुळे हॉटेलचे उत्पन्नही वाढते. घड्याळ नसताना लोक लवकर चेक आउट करण्याचा विचारही करत नाहीत.

खरंच घड्याळाची गरज असते?

आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतातच. त्यात वेळ, अलार्मही असतात. अशा परिस्थितीत हॉटेल्सनी वेगळे घड्याळ का बसवावे?असाही एक प्रश्न निर्माण होतो. हेच कारण आहे की बहुतेक हॉटेल्स रुममध्ये तरी आता घड्याळ लावणे आवश्यक मानत नाही.

स्वच्छता आणि खर्चाचा मुद्दा

प्रत्येक हॉटेलला त्यांच्या रुम्स या स्वच्छ आणि सुशोभित करायच्या असतात. घड्याळांसारख्या वस्तू बसवणे, त्याची बॅटरी तपासणे आणि वेळ निश्चित करणे ही हॉटेल कर्मचाऱ्यांची आणखी एक जबाबदारी बनते. मोठ्या हॉटेल्समध्ये हजारो रुम्स असतात, त्यामुळे घड्याळांची देखभाल करण्याचाही त्यात वेळ आणि खर्च दोन्ही वाढतो. म्हणून, हॉटेल व्यवस्थापन हे घड्याळ लावणे तेवढे महत्त्वाचे मानत नाही.

हॉटेलसाठी चांगला नफा

हॉटेलच्या रुममध्ये घड्याळ नसण्यामागील कारण केवळ हीच कारणे नाहीत तर ती एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे. त्याचा उद्देश पाहुण्यांना असे वाटावे की ते रोजच्या धावपळीपासून, शर्यतीपासून दूर आहेत आणि पूर्णपणे आराम करू शकतात. याचा थेट फायदा हॉटेलला देखील होतो. कारण आलेले गेस्ट जास्त वेळ घालवतात. तसेच ते हॉटेलच्या सर्व सोयी-सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.