AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाड्याच्या बायकोसाठी ‘या’ देशात मोजावी लागते मोठी रक्कम, पर्यटकांमध्ये वाढतेय नवीन क्रेझ

Wife For Rent: आजच्या युगात नाते-संबंधांवर फार कोणी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे अनेक जण लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत करतात. अशात असा एक देश आहे, त्या देशात गर्लफ्रेंड नाही तर, बायको भाड्याने मिळते. ज्यासाठी पुरुषांना मोठी रक्कम मोजावी लागते.

भाड्याच्या बायकोसाठी 'या' देशात मोजावी लागते मोठी रक्कम, पर्यटकांमध्ये वाढतेय नवीन क्रेझ
फाईल फोटो
| Updated on: Sep 09, 2025 | 2:48 PM
Share

Wife For Rent: जगात एक असं देश आहे, जे त्याच्या सर्गिक सौंदर्यामुळे, समुद्रकिनारे आणि नाईटलाइफमुळे प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. या देशाचं नाव थायलंड असं आहे. या देशाचं सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. देशाची एक चांगली बाजू तर आहे, पण दुसरी बाजू कायम चर्चेत असते. परंतु आजकाल हा देश एका अनोख्या आणि वादग्रस्त सामाजिक ट्रेंडमुळे चर्चेत आहे. थायलंड येथे बायको भाड्याने घेण्याचा ट्रेंड दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ज्यामुळे ही संकल्पना वादाच्या भोवऱ्यात आहे.

Wife For Rent: पुस्तकातून मोठा खुलासा…

अमेरिकेतील लेखल लॅवर्ट ए इमॅनुएल यांचं “Thai Taboo – The Rise of Wife Rental in Modern Society’ या पुस्तकात या प्रथेबद्दल सविस्तर लिहिलं आहे. थाडलंड मधील गरीब कुटुंबातील महिला हे काम करतात. ज्यामुळे त्या त्यांच्या कुटुंबाची भूक भागवू शकतील. देशात महिला कायम बार आणि नाईट क्लबमध्ये काम करताना दिसतात. जेथे त्यांची परदेशी पर्यटकांसोबत ओळख होते.

कशी होते तडजोड?

भाड्याने बायको या ट्रेंडला वाइफ ऑन हायर’ किंवा ‘ब्लॅक पर्ल’ असं देखील म्हणतात. यामध्ये काही महिला पर्यटकांसोबत काही काळासाठी त्यांच्या बायको प्रमाणे राहतात. महिला पर्यटकांसाठी जेवण बनवतात, त्यांच्यासोबत फिरायला जातात… एका जोडीदाराप्रमाणे महिला पर्ययटकांसोबत राहतात. हे नातं पूर्णपणे करारावर आधारित असतं आणि त्याला कायदेशीर विवाहाचा दर्जा मिळत नाही. जर एखाद्या पर्यटकाला त्या महिलेबद्दल खोलवर प्रेम वाटत असेल, तर भविष्यात दोघे लग्न देखील करु शकतात.

भाड्याने बायको घेण्यासाठी किती पैसे लागतात?

‘भाड्याने घेतलेल्या बायको’ची फी महिलेचं वय, सौंदर्य, शिक्षण आणि कराराचा कालावधी यावर अवलंबून असते. काही महिला काही दिवस राहतात, तर काही महिने राहतात. रिपोर्टमनुसार, भाडे सुमारे 1.3 लाख रुपये सुमारे 96 लाख रुपयांपर्यंत असू शकतं. हा पूर्णपणे खाजगी करार आहे, कारण थायलंडमध्ये यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही.

दिवसागणिक का वाढत आहे अशी प्रवृत्ती?

बदलती जीवनशैली आणि वाढत्या एकाकीपणामुळे थायलंडमध्ये या ट्रेंडला चालना मिळाली आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, थायलंड सरकारनेही हे मान्य केलं आहे की ही प्रवृत्ती वेगाने पसरत आहे. सरकार आता यावर कायदा करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून या कामात सहभागी असलेल्या महिलांची सुरक्षितता आणि हक्क सुनिश्चित करता येतील.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.