सूप पीताना लोक हमखास करतात ‘या’ चुका, ज्या पडू शकतात भारी

वेगवेगळ्या भाज्या घातलेले, गरमागरम सूप थंडीत पिण्याची मजा वेगळी असते. त्यात भरपूर पोषक तत्वं असल्याने सूप पिण्याचे अनेक फायदे मिळतात. पण सूप बनवताना काही चुका झाल्या तर त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवा.

सूप पीताना लोक हमखास करतात 'या' चुका,  ज्या पडू शकतात भारी
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 2:57 PM

benefits of soup : या थंडीच्या मोसमात गरमागरम सूप पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. यामुळे शरीराला उबदारपणा मिळतो आणि सूपमध्ये पौष्टिक घटक देखील भरपूर असतात, जे आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी सूप पितात, परंतु अनेक वेळा सूप पिऊन काही बदल होत नाही. त्याचे कारण म्हणजे सूप पिण्यात तुमच्याकडून एखादी चूक होत असेल. एखाद्या छोट्याशा चुकीमुळेच सूपचा तुमच्या शरीरावर फारसा परिणाम होत नाही. सूप पिताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण आपल्या काही चुकांमुळे सूपचा परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसत नाही.

त्या गोष्टी कोणत्या हे समजून घेऊया.

सूप तयार करण्यासाठीचे साहित्य

सूप तयार करताना, त्यात कोणत्या भाज्या आणि डाळी वापरतो, याबद्दल काळजी घ्या. तसेच सूपमध्ये किती प्रमाणात प्रथिने, फायबर, कार्ब्स आणि फॅट घातले आहेत, याकडेही लक्ष दिले पाहिजे.

पॅकेटबंद सूप ठरू शकते घातक

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी पॅकबंद सूप पीत असाल, तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. कारण पॅकबंद पदार्थांमध्ये अनेक प्रकारची रसायने, सोडियम आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात, ज्यामुळे ते शरीराला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे घरच्या घरी,नेहमी ताजे सूप बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या.

पातळी समान राखा

सूपमध्ये द्रवाचे योग्य संतुलन असले पाहिजे कारण आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी टाकल्याने सूप पातळ होतो आणि कमी पाण्याने सूप खूप घट्ट होऊ शकते. त्यामुळे सूप बनवताना योग्य प्रमाणात पाणी घालावे. खूप घट्ट किंवा पाचळ करू नका .

मसाल्याचे प्रमाण

सूपची चव वाढविण्यासाठी, अनेक मसाले घालणे फार महत्वाचे आहे. त्यात मीठ, काळी मिरी आणि अनेक प्रकारचे मसाले टाकले जातात. परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त मसाला वापरू नये. यामुळे तुम्हाला छातीत जळजळ होण्याची तक्रार होऊ शकते.

फक्त सूप पिणे

काही लोक पटकन वजन कमी करण्यासाठी नेहमीच्या जेवणाऐवजी फक्त सूपचे सेवन करतात. पण नीट अन्न जेवले नाही तर तुमच्या शरीराला पूर्ण पोषण आणि ऊर्जा मिळत नाही.

सर्व घटक नीट विरघळू द्या

सूप मधील सर्व घटक व्यवस्थित विरघळले पाहिजेत, याकडे लक्ष द्यावे. कारण अनेक वेळा सूप लवकर बनावे यासाठी काही लोक ते पटापट बनवतात, त्यातील घटक व्यवस्थित विरघळू देत नाहीत, त्यामुळे सूपचा पूर्ण फायदा मिळत नाही.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.