पालघर लोकसभा : पुन्हा एकदा वनगांच्या मुलाविरोधात भाजपचा उमेदवार?

पालघर : 1 ऑगस्ट 2014 रोजी सागरी, नागरी आणि डोंगरी भौगोलिक परिसर लाभलेल्या राज्यातील 36 व्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात.  पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर आदिवासी बहुल तालुक्याचा विकास होणं अपेक्षित मानलं जात होतं. याचाच आढावा 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी टीव्ही 9 मराठीने घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही […]

पालघर लोकसभा : पुन्हा एकदा वनगांच्या मुलाविरोधात भाजपचा उमेदवार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

पालघर : 1 ऑगस्ट 2014 रोजी सागरी, नागरी आणि डोंगरी भौगोलिक परिसर लाभलेल्या राज्यातील 36 व्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात.  पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर आदिवासी बहुल तालुक्याचा विकास होणं अपेक्षित मानलं जात होतं. याचाच आढावा 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी टीव्ही 9 मराठीने घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते चिंतामण वनगा यांनी 2 लाख 29 हजार मतांच्या फरकाने बहुजन विकास आघाडीचे खासदार बळीराम जाधव यांचा पराभव केला. पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा, बोईसर विधानसभा क्षेत्रात बविआचा प्रभाव होता. तर पालघर विधानसभेत काँग्रेसचा आणि डहाणू विधानसभा क्षेत्र मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा वगळता अन्य ठिकाणी भाजपचे वर्चस्व अत्यल्प असतानाही मोदी लाटेची जादू पालघर जिल्ह्यात पाहायला मिळाली आणि भाजपाचे चिंतामण वनगा 5 लाख 33 हजार 201 मताधिक्य मिळवत 2014 मध्ये विजयी झाले.

पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत

29 जानेवारी 2018 मध्ये खासदार वनगा यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघासाठी पोट निवडणूक घेण्यात आली. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने प्रथमच शक्ती पणाला लावत उडी घेतली आणि निवडणुकीची चुरस वाढवली. दिवंगत खासदार वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी भाजपकडून डावलण्यात येत असल्याच्या कारणावरून पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राहिलेले राजेंद्र गावित यांना भाजपाने उमेदवारी देत पक्षाच्या गळाला लावलं. शिवसेनेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रथमच पालघर जिल्ह्यातील तलासरी, पालघरमध्ये सभा घेत निवडणुकीत भगवा फडकवण्याचा निर्धार केला. मे 2018 मध्ये झालेल्या पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गावित विजयी झाले, तर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी दोन नंबरची मते मिळवली. शिवसेना पालघर लोकसभा मतदारसंघात सत्ता भविष्यात काबीज करू शकते याची चुणूक दाखवून दिली.

सध्याची परिस्थिती पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी भाजप-शिवसेना युती झाली नाहीतर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते. तर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाकडून माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी मिळण्याचे चिन्ह दिसत आहेत. तरी अन्य युवा उमेदवार उभे करणार असल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. कारण, काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवार न देता बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देऊन उमेदवार निवडून आणायचा प्रयत्न काँग्रेसकडून होऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न असेल. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाकडून किरण गहला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी ऐन निवडणुकीवेळी राजकीय गुणसूत्र बदलू शकतात आणि मार्क्सवादी पक्षाची मते बहुजन विकास आघाडीकडे वळवण्यासाठी किंवा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात.

पोट निवडणुकीत विजयी उमेदवार

राजेंद्र गावित (भाजप) 2,72782 ( विजयी)

श्रीनिवास वनगा (शिवसेना) 2,43,210 ( पराभूत )

पालघर लोकसभा पोट निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात उभे होते

पालघर जिल्हा लोकसंख्या : एकूण 2990116  (2011 जनगणनेनुसार )

एकूण तालुके : वसई, वाडा, जव्हार, मोखाडा, पालघर, डहाणू, तलासरी आणि विक्रमगड

पालघर लोकसभा एकूण मतदार :- 17 लाख 24 हजार 06

पुरुष मतदार

9 लाख 03 हजार 786

महिला एकूण मतदार

8 लाख 20 हजार 80

एकूण सहा विधानसभा डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई

डहाणू ,विक्रमगड विधानसभेत : भाजपाचे आमदार

पास्कल धणारे : डहाणू विधानसभा

विष्णू सावरा : आदिवासी विकास मंत्री : विक्रमगड विधानसभा

आ. हितेंद्र ठाकूर बहुजन – विकास आघाडी – वसई विधानसभा

आ.क्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडी – नालासोपारा विधानसभा

विलास तरे : बहुजन विकास आघाडी – बोईसर विधानसभा

अमित घोडा  – शिवसेना – पालघर विधानसभा

महत्त्वाचे मुद्दे :

पालघर जिल्ह्यात गरोदर माता मृत्यू, बालमृत्यू, कुपोषण इत्यादी सारखे मुद्दे अद्यापही कायम असून बेरोजगार, रोजगार, कुपोषण सारखे मुद्दे सोडविण्यात सध्याचे सरकार अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

डहाणू, विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल तालुक्यातून रोजगाराच्या सोयी उपलब्ध नसल्याने होणारं स्थलांतर या मुद्द्यासह आरोग्याच्या सोयीसुविधा, शिक्षण, पाणी इत्यादी मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन चार वर्षे उलटत आली तरी अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयासाठी स्वतःची शासकीय इमारत उभारण्यात सध्याचे सरकार अपयशी झालंय. इतकेच काय तर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची असलेली रिक्त पदे, अपुरी कर्मचारी संख्या इत्यादीमुळे जिल्ह्याचा होणारा विकास खुंटला आहे.

सध्याचा पालघर जिल्हा म्हणजे प्रकल्पाचा जिल्हा म्हणून नवी ओळख होऊ पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प, समृद्धी महामार्ग, रिलायन्स गॅस, गेल इंडिया गॅस, अशा अनेक प्रकल्पांमध्ये स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन होत आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी शेतकरी संतप्त आहे. वाढता विरोध आगामी निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावू शकतो.

शहरी आणि डोंगरी भागातील समस्या वेगवेगळ्या असल्या तरी मुंबईपासून अवघ्या 100 ते 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्याचा विकास खुंटला असताना झपाट्याने नागरीकरण वाढीस लागत आहे. यामुळे पालघर जिल्ह्याचे आगामी निवडणुकीचे गणित वेगळं असेल यात शंका नाही.

संबंधित बातम्या :

परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड
कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!
रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?
हिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर
नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?
उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?
माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?
Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.